शिरुरच्या बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार; एकनाथ शिंदे

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पाबळ (सुनिल जिते) गेल्या काही वर्षात महायुती सरकारने जलदगतीने कामे करत अडीच वर्षात विकासाचे अनेक निर्णय घेतल्याने जनतेने इतिहासात प्रथमच महायुतीला भरघोस यश दिले असल्याने आता पुढील काळात महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्क्याने जिंकेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई देवीच्या पटनाम सोहळा वेळी देवीच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माढाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, सरपंच राजश्री रुपनेर, उपसरपंच योगेश पुंडे, पुणे जिल्हा युवासेना प्रमुख बापुसाहेब शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, बबन शिंदे, सोपान जाधव यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मेसाई देवीच्या दर्शनासाठी मी नेहमी येत असतो. सध्या शिरुरला बऱ्याच वर्षाने देवीच्या दर्शनाला आलो आलो आहे. येथे आल्याने अनेक वर्षापुर्वीच्या आठवणी मला मिळाल्या असून सर्वसामान्य लोकांच्या व्यथा समजल्या आहेत. सध्या कान्हूर मेसाई गावात खुप बदल झाला असून येथील लाडक्या बहिणी मला भेटल्या असल्याचे सांगत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्यानंतर आजच त्याबाबत आज शासन निर्णय निघाला असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने मोठा कौल दिला त्यामुळे आम्ही जोमाने काम करतोय आणि आमची जबाबदारी वाढली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

यावेळी शिरुर तालुक्यातील बारा गावांच्या पाणी प्रश्नाबाबत बोलताना शिंदे यांनी येथील पाण्याच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी व संबधित विभागांशी बोलतो असे सांगत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना याबाबतचा अहवाल बनवुन पाठवण्याच्या सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहे.

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद

शिरूर! बिबटयाच्या हल्ल्यात दहा बकऱ्या आणि घोडा ठार

शिरुर; शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरी करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक