घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

आरोग्य

1) हळद:- हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे.

2) ऑलिव ऑयल:- ऑलिव ऑयलमुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव ऑयलने तुम्ही नाक साफ केल्यास तुम्हाला श्वास घेण्यास सोपं होईल. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव ऑयलचे दोन तीन थेंब नाकात घाला आणि मग झोपा. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास मदत होईल.

3) देशी तूप:- रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करा आणि ते नाकात टाका. यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल.

4) लसून:- घोरण्याच्या समस्येवर लसून हे रामबाण उपाय आहे. लसूनचं सेवन केल्यामुळे तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्ता मिळू शकता. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन तीन लसून खा.

5) पुदिना:- पुदीनाची पाने पाण्यामध्ये उकळा त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या करा. अगदी हे पाणी प्यायला तरी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसांनी तुमची घोरण्याची समस्या कमी होईल.

6) हळद आणि मध:- रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमच हळद आणि एक चमचा मध याचं सेवन करा. रोज काही दिवस हे केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होईल.

(सोशल मीडियावरुन साभार)