मुले पळविणारी टोळी आली या अफवावर विश्वास ठेवु नका…

महाराष्ट्र

औरंगाबाद: मागील काही दिवासापासुन औरंगाबाद जिल्हयात सोशल मिडीयाचे माध्यमांतुन मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे, तसेच वाहनातुन मुलांचे अपहरण केले आहे अशा स्वरूपाच्या अनेक अफवाचे पेव फुटले आहे. या अफवामुळे नागरिक कोणतीही खातरजमा न करता अशा अफवांवार विश्वास ठेवु अशा प्रकारचे संदेश, व्हिडीओ किल्प या सोशल मिडीयावर सरास पुढे फॉरर्वड करण्यात येत आहे.

औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, ग्रामीण जिल्हयातील नागरिकांना आवाहन केले आहे कि, औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात कुठेही लहान मुले पळवुन नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय नाही. जिल्हयात अशा प्रकारे सोशल मिडीयाचे माध्यमातुन या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवुन नये किंवा भिती बाळगु नये. जिल्हा पोलीसांनी या अफवेची शहानिशा व सखोल चौकशी केली असता ही अफवा तत्यहीन व खोटी असल्याची खात्री झाली आहे.

शाळा, महाविद्यालय, परिसरात पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सर्तक असुन अशा घटनांना जलद प्रतिसाद दिला जातो त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती बाळगु नये. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. घर गल्ली, किंवा परिसरात संशयास्पद अनोळखी व्यक्ती, वाहन, आढळल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. स्वत:हुन अशा संशयास्पद व्यक्तीस मारहाण अगर वाहनास तोडफोड, करु नये कायदा हातात घेऊ नये.

जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचे व्हिडीओ, संदेश, विनाकारण व्हायरल करून जाणीवपुर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळुन आल्यास त्याचे विरूध्द सक्त कायदेशिर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल. नागरिकांना संशय असल्यास खालिल क्रमांकावर पोलीसांना तात्काळ माहिती द्यावी. नमुद क्रमांक हे 24 तास नागरिकांसाठी कार्यान्वित आहेत.