आमदारांना असमान निधी वाटप म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधीवर अन्याय; अंबादास दानवे

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्यात सरकारकडून विरोधक आमदारांना निधीवाटपातून डावळले त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात आवाज उठविला. तसेच विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे दानवे म्हणाले.

विधानपरिषदेच्या आमदार यांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं सांगितलं मात्र ते सपशेल चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले. निधी वाटपाची रक्कम ही जनतेच्या करातून वसूल करून दिली जाते. ज्या मतदारसंघात निधी दिला नाही तेथील जनता कर भरत नाही का ? त्यांना विकासाचा अधिकार नाही का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. असमान निधी वाटप झाले की नाही याबाबत सरकारने खुलासा करावा तसेच सरकारने याबाबत सुस्पष्ट भूमिका मांडली पाहिजे असे दानवे यांनी म्हटले.

सर्व आमदारांना समान निधी वाटपाबाबत धोरण आखणार का असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री यांनी याबाबत कोणावर अन्याय होणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली.