मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिरूर तालुका

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी विविध रंगी वारकरी पोशाख परिधान करत खांद्यावर पालखी, पताका, झेंडे, तुळशी, टाळ घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होत दिंडीचे आकर्षण निर्माण केले. यावेळी प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी आषाढी एकादशीचे तसेच वारकरी संप्रदायाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले, तर यावेळी उपस्थितांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा व मूर्तीचे पूजन करत पालखी सोहळा गावात मार्गस्थ झाला.

unique international school
unique international school

सदर गावातील काळ भैरवनाथ मंदिराच्या परिसरात गोलाकार रिंगणामध्ये अभंग, भजन, ओव्यांचे गायन केले. तर रिंगणाच्या मध्यभागी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी फुगडी सह वेगवेगळ्या कला सादर करत आनंद व्यक्त केला. सदर पालखी सोहळा आयोजित करण्यासाठी प्राचार्य तुकाराम शिरसाट, सविता लिमगुडे, रूपसिंग मल्लाव, सिमा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याने गाव विठ्ठल नामाच्या गजरात वाहून गेले तसेच संस्थेचे सचिव सुरेश पलांडे यांच्या वतीने वारकरी विद्यार्थ्यांना फराळ वाटप केल्याने विद्यार्थी सुद्धा आनंदून गेले. तर प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी सर्वांचे आभार मानले.