विठ्ठलवाडीत जमिनीच्या वादाची चर्चा करताना दोन गटात हाणामारी

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून केलेल्या तक्रारी बाबत चर्चा करताना पुन्हा 2 गटात हाणामारी झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ ज्ञानोबा हंबीर, विठ्ठल ज्ञानोबा हंबीर, कांतीलाल दत्तोबा हंबीर, सुरेश दत्तात्रय हंबीर, स्वप्नील विठ्ठल हंबीर, शुभम नवनाथ हंबीर, दिलीप दत्तोबा हंबीर, निवृत्ती गेनभाऊ हंबीर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील नवनाथ हंबीर व योगेश गवारी यांच्यात 2 दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून हाणामारी झालेली असताना नवनाथ हंबीर याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली होती. त्यानंतर त्यांच्यात चर्चा होऊन तक्रार मिटवण्याचे ठरलेले असल्याने नवनाथ हा त्याचे शेतात असताना योगेश सदर ठिकाणी चर्चा करण्यासाठी गेलेला असताना हंबीर याचे भावकीतील लोकांनी सदर ठिकाणी येत योगेश गवारी यास काठीने बेदम मारहाण करत जखमी दिले. यावेळी योगेश याने आरडओरडा केल्याने त्याच्या घरातील लोक धावून आल्याने मारहाण करणारे सर्व जण योगेश यास शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

घडलेल्या प्रकाराबाबत योगेश पांडूरंग गवारी (वय ३६) रा. मीरगव्हाण वस्ती विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नवनाथ ज्ञानोबा हंबीर, विठ्ठल ज्ञानोबा हंबीर, कांतीलाल दत्तोबा हंबीर, सुरेश दत्तात्रय हंबीर, स्वप्नील विठ्ठल हंबीर, शुभम नवनाथ हंबीर, दिलीप दत्तोबा हंबीर, निवृत्ती गेनभाऊ हंबीर सर्व रा. मीरगव्हाण वस्ती विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अमोल चव्हाण हे करत आहे.