वसंत पडवळ यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला ५१ हजार रु देणगी सुपुर्द…

शिरूर तालुका

जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थांना खेळासाठी ट्रॅकसुट किटभेट

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील माजी सरपंच व प्रसिद्ध उद्योजक वसंत पडवळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कुठलाही थाटमाट न करता श्री गुरुदेव दत्त विदयालयातील उच्च माध्यमिक विज्ञान शाखेसाठी 51 हजार रुपयांची देगणी दिली. तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सर्व विदयार्थ्यांना खेळासाठी 50 हजार रुपयांचे ट्रॅकसुट किट प्रदान करण्यात आले. यापुर्वीही त्यांनी अनेक गरजू ,गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे.

माजी सरपंच पडवळ यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सविंदणे गावचा चेहरामोहरा बदलून चांगला विकास केला आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पोपट शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, विठ्ठल पडवळ, चेअरमन रामदास पङवळ, संचालक बाबाजी पडवळ, सचिव बाळासाहेब पडवळ, वसंत आप्पा नरवडे, गणेश कोळेकर, पत्रकार अरुणकुमार मोटे ,शिक्षक व ग्रामस्थ मोठया संखेने हजर होते