ग्रामस्थांनी पोलिसांसोबत काम करत सहकार्य करावे; यशवंत गवारी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारीचा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाबरोबर ग्रामस्थांची भूमिका महत्वाची असून ग्रामस्थांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करत पोलिसांच्या बरोबरीने काम करावे, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी संवाद साधताना शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी बोलत होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे, संदीप कारंडे, करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सरपंच सोनाली ढोकले, ग्रामपंचायत सदस्य नितीन, अंकुश पंचमुख, बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य कोंडीबा साबळे, अर्चना पंचमुख, कांताराम नप्ते, संतोष दरेकर, अंकुश पंचमुख, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना 1 जानेवारी रोजी आपल्या परिसरात होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखला जाईल असे काम ग्रामस्थांनी करावे, गावातील सर्व सीसीटीव्ही चालू ठेवावेत, गावामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवावे, कार्यक्रमा निमित्त पोलीस बंदोबस्त साठी येणाऱ्या पोलिसांना ग्रामस्थांनी सहकार्य करत पोलिसांच्या सूचनांचे पालन करत पोलिसांच्या बरोबरीने काम करावे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले.

सर्वांनी नेहमीप्रमाणे सहकार्य केल्यास नक्कीच शौर्य दिनाचा होणारा कार्यक्रम शांततेत पार पडू शकतो, असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.