Gas Cylinder

शिरूरमधील ‘त्या’ बडया एच.पी गॅसवर कधी होणार कारवाई?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात गॅस टाक्यांच्या रिफिलींगचा काळाबाजार उघड झाला असून, या रिफिलींगसाठी घरगुती गॅस पुरवणाऱ्या एस.डी. दुगड एच.पी एजन्सीवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील योग्य ती कारवाई झाली नसून, अजूनही सदरचा एजन्सीधारक गोडावून मधून खुलेआम काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री करत आहे. रांजणगावात पोलिस स्टेशनसमोरच हाकेच्या अंतरावर रिफीलींगवाले घरगुती टाकीतून ४ किलोच्या टाकीत […]

अधिक वाचा..
arrest

भारतामधील शेकडो व्यवसायीकांना फसविणाऱयाला शिरूरमधून अटक

पुणेः भारतामधील शेकडो एलिव्हेटर (लिफ्ट) व मार्बल व्यवसायीकांना फसविणा-या तोतया डॉक्टर सायबर गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. १६१ / २०२२ भा. द. वि. कलम ४१९, ४२०, ३४, माहिती तंत्रज्ञानकायदा क-६६ (डी) मधील फिर्यादी विठ्ठल गजानन भोसले (वय ४८ वर्षे, धंदा- लिप्ट […]

अधिक वाचा..
Money

शिरुर तालुक्याच्या पूर्वभागातील अजून एका सावकारावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): पतीला अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्याने नाईलाजाने पतीच्या उपचारासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. त्या बदल्यात बँकेचे तीन चेक तसेच काही जमीन संबंधित सावकाराच्या नावाने खरेदीखत करुन दिली. मुद्दल आणि व्याजही परत दिले असताना अधिक व्याजाची मागणी करत खरेदीखत केलेली जमीन परत द्यायला नकार दिला. शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमध्ये संपूर्ण कुटुंब झोपेत अन् कोसळली भिंत…

सुदैवाने मुळे बचावली तर पती, पत्नी व आई किरकोळ जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार, संततधार पाऊस सुरु असताना अनेक दुर्घटना घडत असताना शिक्रापूर येथे एका घराच्या शेजारची भिंत घरावर कोसळली. एका साध्या घराच्या पत्र्याची भिंत कोसळून आतमध्ये मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंब बचावले. मात्र, घरगुती साहित्यांचे नुकसान झाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..
dead

रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा उंचावरुन पडल्याने मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील K K नाग कंपनीत उंचावरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील के के नाग कंपनीत गोडाऊनचा पत्रा बसवण्याचे काम चालू होते. यावेळी जोरात वारा आल्याने हे काम करणारा कामगार वरुन खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. विठ्ठल सिताराम […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरूर तालुक्यात अवैधरीत्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय जोरात सुरू…

गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बडया एच.पी गॅसच्या एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार करून घरगुती गॅसचे कमर्शियल वापरासाठी रिफींलींग करून आर्थिक फायदयासाठी मोठया प्रमाणावर विक्री होत आहे. शिरूर शहरातील एजन्सीचे बेकायदेशीर गोडावून नदीच्या पलीकडे (गव्हाणवाडी, ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे असल्याची व येथून बेकायेदशीरपणे काळया बाजारात गॅस टाक्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातून एकाला पाठलाग करून पकडले; वाहनांसह मोबाईल जप्त…

पुणेः सराईत गुन्हेगाराकडून आठ वाहने व जबरी चोरीतील 2 मोबाईल तसेच 2 गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास पाठलाग करून गुन्हे शाखा, युनिट 2 ने जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशान्वये वाहन चोरीच्या अनुषंगाने युनिट – 2 चे स्टाफ पेट्रोलींग करीत होते. युनिट -२ कडील पोलिस […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील महिलेचा प्रियकराने संशयावरुन केला खून…

पुणेः अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना ‘त्या’ महिलेची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पण, अनोळखी महिलेच्या खुनाचा लोणी काळभोर पोलिसांनी छडा लावला आहे. लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत ०५ जुलै २०२२ रोजी थेऊर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी महिला वय अंदाजे २० ते २५ वर्ष, […]

अधिक वाचा..

शिरूरमधील सराफास खंडणी मागणारा ७२ तासांत जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामधील सराफास एक कोटी रूपयांची खंडणी मागणाऱयाला स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई ७२ तासांत जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातील सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यांना ०४/०७/२०२२ रोजी अनोळखी नंबरवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून व मेसेज करून मी डी. के. ग्रुपमधुन बोलत आहे, तु मला खंडणीसाठी एक […]

अधिक वाचा..
dead

रांजणगावमध्ये टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जखमी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिराच्या समोर बुधवारी (ता. ६) रोजी टँकरने धडक दिल्याने गोरक्ष शंकर भुजबळ (वय 55, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात भुजबळ यांचे नातेवाईक भीमा हरिभाऊ गोरे (रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर, जि.अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत विश्वास गोरक्ष भुजबळ यांनी फिर्याद दिल्याने टँकर […]

अधिक वाचा..