सरकारने ‘उमेद’च्या मोर्चाला सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात; नाना पटोले

मुंबई: ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद, राबिवले जात आहे. उमेदच्या कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी उमेदच्या लाखो महिलांचा आझाद मैदानावर मोर्चा आलेला आहे. भर पावसात हा मोर्चा आलेला असून राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य […]

अधिक वाचा..

विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा; नाना पटोले

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच तात्काळ त्याची अंमलबजावणी व्हावी,अशी […]

अधिक वाचा..

मराठवाडा वॉटर ग्रीड साठी सरकार प्रयत्नशील; धनंजय मुंडे

मुंबई: ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे […]

अधिक वाचा..

तुमच्या नंतर संपत्तीचा खरा मालक कोण? नॉमिनी की उत्तराधिकारी; जाणून घ्या फरक…

संभाजीनगर: मालमत्तेची खरेदी, बँक खाते किंवा पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला एखाद्याला नॉमिनी बनवण्यास सांगितले जाते. तुमच्या नंतर संबधीत खात्यातून किंवा पॉलिसी इत्यादीमधून पैसे काढण्याचा अधिकार फक्त नॉमिनीलाच मिळतो. पण तुमचा नॉमिनी उत्तराधिकारी असावा असे नाही. कारण बरेच लोक नॉमिनी आणि उत्तराधिकारी एकच मानतात. पण यामध्ये फरक असू शकतो. नॉमिनी कोण असतो? जेव्हा तुम्ही एखाद्याला मालमत्ता […]

अधिक वाचा..

अन्याय दूर करा अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल; बाळासाहेब थोरात

मुंबई: राज्य सरकारने ज्या 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे सरकारने अन्याय दूर करावा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात […]

अधिक वाचा..

जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये मराठवड्यामध्ये पेरण्यांना वेग येईल; कृषिमंत्री धनजंय मुंडे

मुंबई: भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार माहे, जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज प्राप्त आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी पिक […]

अधिक वाचा..

आमदारांना असमान निधी वाटप म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधीवर अन्याय; अंबादास दानवे

मुंबई: राज्यात सरकारकडून विरोधक आमदारांना निधीवाटपातून डावळले त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात आवाज उठविला. तसेच विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे दानवे म्हणाले. विधानपरिषदेच्या आमदार यांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं […]

अधिक वाचा..

संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; अजित पवार

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी; अंबादास दानवे 

मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २६० अनव्ये प्रस्तावावर भाषण करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या पाहता सरकारच डोक ठिकाणावर येण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले. मोठया […]

अधिक वाचा..

हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर…!

संभाजीनगर: माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतल्या आर एम एल रुग्णालयामध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन […]

अधिक वाचा..