ashok-kharat

शिरूरच्या राजकीय पुढाऱ्याकडून अशोक खरात अन् दोन आमदारांना आलिशान महागड्या गाड्यांची भेट…?

महाराष्ट्र मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात याने काही महिन्यांपुर्वी शिरुरमधील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद याच्यावर तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करत वावी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुक्यातील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद सध्या वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात याच्यासोबतच्या एका जुन्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. शिरूर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याने अशोक खरात याला काही वर्षांपुर्वी एक महागडी आलिशान कार भेट दिली असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. शिवाय, दोन आमदारांनाही दोन महागड्या आलिशान कार भेट दिल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या संपूर्ण व्यवहारामागील ‘गुपित’ काय आहे…? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मोठ्या बांधकामाचा ठेका मिळाल्यानंतर संबंधित पुढाऱ्याची आर्थिक ताकद झपाट्याने वाढल्याचे बोलले जात आहे. यानंतरच दोन आमदारांना देखील महागड्या आलिशान गाड्या भेट दिल्याची चर्चा  नागरिकांमध्ये व सोशल मीडियावर सुरू आहे. विशेष म्हणजे, या गाड्यांचा ‘पॅटर्न’ आणि ‘मॉडेल’ धर्मगुरु अशोक खरात याला दिलेल्या गाडीप्रमाणेच असल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व घटनांमुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
1) या गाड्या नेमक्या कोणत्या पैशातून खरेदी करण्यात आल्या…?
2) हा व्यवहार ‘गिफ्ट’ आहे की ‘गुंतवणूक’…?
3) संबंधित आमदारांनी या भेटी स्वीकारताना कोणती कायदेशीर प्रक्रिया पाळली का…? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व प्रकरणामागे राजकीय-सामाजिक दबावाचे मोठे जाळे कार्यरत आहे का…?

दरम्यान, राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, विरोधकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित पुढारी आणि लाभार्थी आमदारांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, प्रशासन आणि तपास यंत्रणा या चर्चांकडे गांभीर्याने पाहणार का, की पुन्हा एकदा हे प्रकरण दडपले जाईल, याकडे संपूर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

(क्रमश:)

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर