केंदूरच्या विदयार्थांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी: दिपक साकोरे 

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील तरुण अधिकाधिक स्पर्धा परीक्षेत यशसंपादक करत असून केंदूरच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अभ्यासाची आतापासूनच तयारी करुन जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले पाहिजे, असे मत राज्य राखीव बल पोलीस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे यांनी व्यक्त केले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित सरदार रघुनाथराव […]

अधिक वाचा..

शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा: जयंत पाटील

मुंबई: देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा राक्षस नष्ट व्हावा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गणरायाला घातले. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आज दोन वर्षानंतर राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानीही […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या सिद्धिविनायक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार वाव्हळ व पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिमन्यू […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई विद्याधामच्या NMMS परीक्षेत तब्बल 15 विद्यार्थांना घवघवीत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा राखत नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयातील 15 विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली असल्याने त्यांना 12 वी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याने प्रत्येक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याला एकूण 48 […]

अधिक वाचा..

करंदीत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले तसेच नागरिकांना दर्शन होत असताना नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली असता शिरुर वनविभागाच्या वतीने येथील राहुल ढोकले […]

अधिक वाचा..

धानोरेत ग्रामपंचायत कडून शाळेला संगणक संच भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): धानोरे (ता. शिरुर) येथील शेरी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामपंचायतच्या वतीने संगणक संच भेट देण्यात आला असून नुकतेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संगणक संच शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. धानोरे (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी वस्ती या शाळेसाठी संगणकाची आवश्यकता असल्याने शाळेच्य वतीने ग्रामपंचायत कडे संगणकची मागणी करण्यात […]

अधिक वाचा..

मोराची चिंचोलीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी वामनराव नाणेकर

शिक्रापूर (शेरखान शेख): मोराची चिंचोली (ता. शिरुर) या पर्यटन क्षेत्र असलेल्या गावची तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वामनराव नाणेकर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोपटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावची विशेष ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली, यावेळी गावच्या जलजीवन मिशन, वन समिती, कोविड लसीकरण या […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीसाठी नवीन संकल्पना राबवणार: अरमीन मोदी

शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय मुलांच्या सध्याच्या शिक्षणात टॅब महत्वाचा घटक बनला असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी टॅब सह नवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जपानच्या आस्थानो काय संस्थेच्या अरमीन मोदी यांनी केले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे यापूर्वी कोरोना काळामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी तीस टॅब उपलब्ध करुन देणाऱ्या आस्था […]

अधिक वाचा..

आण्णापूर ते मलठण या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुरवरुन पाबळ, राजगुरुनगर, भिमाशंकर तसेच पारगाव, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या मोठ्या गावांना जाणारा तसेच अष्टविनायक महार्गाला जोडणारा जवळचा व दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा महामार्ग आहे. परंतू या रस्त्यावरील आण्णापूर ते मलठण या रस्त्याची खड्डयांमुळे मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांचे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत भाग घेत यशस्वी कामगिरी केल्याने सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादित केले असल्याची माहिती सोमनाथ अभंग यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथे पार पडलेल्या दहाव्या […]

अधिक वाचा..