सोसायटीमध्ये बोगस कर्ज दाखवून त्यांना जाच केल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): बाभुळसर (ता. शिरूर) येथील बाभुळसर विविध कार्यकारी सह सोसायटीमध्ये शहाजी ज्ञानदेव मचाले रा. बाभुळसर यांचे नावे बोगस कर्ज दाखवून त्यांना त्याबाबत त्यांना जाच करुन गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवनाथ चंद्रकांत फराटे, बाळासो बबन फराटे दोघे रा. मांडवगण फराटा, मच्छिंद्र सुखदेव सकपाळ राहणार -आंबळे, अनिल सुभाष लोहार रा. न्हावरा, अर्जुन प्रल्हाद जगताप रा. तांदळी, विजय सोपान नागवडे रा.बाभूळसर, विजय चव्हाण रा. पारगाव ता. दौंड या तत्कालीन सचिवासह संचालक मंडळातील ७ जणांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, (दि. २०)रोजी ०२ :१५ वाजल्याच्या सुमारास मौजे बाभूळसर बुद्रुक येथे शहाजी ज्ञानदेव मचाले यांनी त्यांच्या राहत्या घराच्या पुढे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या नावावर बाभुळसर विविध कार्यकारी सह. सोसायटीमध्ये बोगस कर्ज दाखवून त्यांना वरील 7 जणांच्या तत्कालीन संचालक मंडळ यांनी जाचहाट करून शहाजी ज्ञानदेव मचाले यांना गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे.

याबाबत मयताचे पुतणे गणेश तानाजी मचाले यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी सहाय्यक पोलिस ऊपनिरीक्षक संदिप यादव हे करत आहे.