devendra-fadnavis-mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे, (तेजस फडके) : वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी (ता. ५) उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत होता. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शिरुर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी शिवसेना शिंदे गटातून उमेदवार आयातही करण्यात आला. सुरुवातीला दुरंगी वाटाणारी लढत आता वंचितमुळे तिरंगी होणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. वंचितने तिकीट जाहीर करण्याच्या एकदिवस आधी हेच उमेदवार पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष असा प्रवास करून आलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता या मतदारसंघात खासदार डॉ. कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील आणि मंगलदास बांदल अशी तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंगलदास बांदल हे अपक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, सध्या ते भाजपच्या जवळ असल्याचे दिसत आहे.

मंगलदास बांदल यांनी इंदापूरमध्ये उद्योजक दशरथ माने यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वंचितची उमेदवारी घोषित झाल्यानंतर फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. मंगलदास बांदल म्हणाले ‘दशरथ माने यांची वैयक्तिक कामासाठी भेट घेण्यासाठी आलो होतो. सुदैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे आले. ही भेट कुठेही पूर्वनियोजित नव्हती. फक्त योगायोगाने ही भेट झाली. यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. यावरुन लोक चर्चा करत असतील तर त्याला काहीही अर्थ नाही.’

शिरूरमध्ये तिहेरी लढत, मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर…

शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी; 5 वर्ष कुठे होतात??

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…