संभाजीनगर: गावाकडून तालुक्याच्या किंवा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *स्वाधार योजनेचा* मोठा फायदा होणार आहे!
योजनेची वैशिष्ट्ये
दरवर्षी ४३,००० रुपये- शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना
तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना ३८,००० रुपये
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- जादा ५,००० रुपये
बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- २,००० रुपये शैक्षणिक साहित्य
या योजनेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना राहणे व जेवण यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया (Online Application Process)
अधिकृत संकेतस्थळ https://hmas.mahait.org वर जा
नवीन नोंदणी (Registration) करा
Student Registration वर क्लिक करा
आधार क्रमांक, नाव, मोबाईल नंबर व ई-मेल टाका
OTP द्वारे मोबाईल नंबरची पडताळणी करा
Login करा
Username व Password वापरून लॉगिन करा
Dashboard वर अर्जाची लिंक दिसेल
अर्ज फॉर्म भरा
वैयक्तिक माहिती (Personal Details)
शैक्षणिक माहिती (Educational Details)
कॉलेज व कोर्सची माहिती
राहण्याचा पत्ता व निवासाचा प्रकार (वसतिगृह किंवा भाड्याने)
कागदपत्रे अपलोड करा (PDF स्वरूपात)
लक्षात ठेवा
फक्त नवबौद्ध किंवा अनुसूचित जाती जमातीच्या विद्याऱ्यांसाठीच ही योजना आहे.
अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर च या योजनेचा लाभ मिळतो.
3० वर्षांपर्यंत व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत फायदा मिळतो
शिक्षणातील खंड दोन वर्षांपेक्षा जास्त नसावा.