shirur-mns-leader

शिरूरमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक झाले आहे. नगरपरीषदेच्या आधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला आहे.

शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये शिरूर बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या फ्लेक्स उभारलेले आहेत. देशात, राज्यात तसेच शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहाने सुद्धा फ्लेक्स बंदिचा ठराव केलेला आहे. शहरात इतरांना फ्लेक्स लवण्यास बंदी करण्यात येते आहे. परंतु, सदर कंपनीने नगरपरिषदेतील कोणत्या कर्मचा-याच्या आशिर्वादाने बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आले. याची चौकशी करण्यात यावी व तात्काळ सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे मनसेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे यांनी सांगितले आहे.

तोंड पाहून व पैसे घेऊन काम करणारा ,नगर पालिका कर्मचारी बर्गेवर कारवाई कधी होणार?
शिरूर नगरपालिका कर्मचारी बर्गे सरास तोंड पाहून व पैसे घेऊन काम करत आहे, अशी चर्चा आहे. काही दिवसापू्वी शिरूर शहरात महिला दहीहंडी कार्यक्रमाचे प्रथमच काही महिलांनी आयोजन केले होते, त्यांनी रीतसर सर्व परवानग्या मागितल्या होत्या, पण नगरपालिकेतील बर्गे यांनी अवास्तव पैसे मागत त्यांना कोणत्या ही प्रकारची मदत अथवा सेवा नगरपालिकेच्या माध्यतून उपलब्ध करून दिली नाही. अशी गाऱ्हाणी महिलांनी मांडली आहेत. त्याच कालावधीत शिरूर शहरात एका डायमंड कंपनीने मोठ्या स्वरूपात डायमंडचे नेकलेस व इतर डायमंड ज्वेलरी चे प्रदर्शन एका हॉटेलमध्ये ठेवलेले बोर्ड संपूर्ण शहरात लावण्यात आले होते. परंतु, तीन दिवस सलग ते बोर्ड शिरूर शहरातील चौकात असूनही नगरपालिका कर्मचारी अथवा बर्गे यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती म्हणजेच पैशाच्या पाकिटाखाली नगरपालिका अधिकारी बर्गे आंधळा होतो.

शिरूर बस स्थानकाच्या बाहेर बऱ्याच प्रमाणात बोर्ड व फ्लेक्स लावून मोठी कमान उभारण्यात आली असताना सु्द्धा ही बाब मनसे उपजिल्हाध्यक्ष महबूब सय्यद, प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, जनहित कक्ष अध्यक्ष रवी लेंडे, जनहित कक्ष चे सुशांत कुटे, रवी गुळादे यांनी नगरपालिकेला निवेदन देत, त्वरित बोर्ड काढण्याची विनंती केली असता बर्गे यांनी उलट सुलट उत्तर दिले असता मनसे अधिकारी व बर्गे यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसले. कोणत्याही ही सामजिक अथवा राजकीय कार्यक्रमासाठी बोर्ड लावण्याची परवानगी न देणाऱ्या अथवा लावले तरी लगेच कारवाई करणारा बर्गे आज गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

शिरूर तालुक्यात आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा…

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील पदपथावरील विजेच्या खांबातून होतेय वीज चोरी

1 thought on “शिरूरमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक…

  1. मनसेचा माजी…. शिव सेनेचा आजी…. २ तोंडाचा गांडूळ… सगळीकडून खायला पाहिजे बंडगुळला…. वेळ आहे सुधारा स्वतः ला

Comments are closed.