shirur-taluka-logo

विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून होतेय नियमबाह्य बेकायदेशीर वसुली…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य बेकायदेशीर वसुली होत असल्याची तक्रार पुढे आल्यानंतर मनसेची शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिरूर शहरातील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्राथमिक शाळेने शाळेने इ. १ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन एक मूल्यशिक्षण कार्यक्रमानुसार सवैधानिक आणि मूल्यांवर आधारित या विषयाच्या आधारे नवीन व्यवसाय सुरू केला आहे. शांतीलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेचा वापर यासाठी करण्यात आहे.

वस्तुस्थिती अशी आहे शांतीलाल मुथ्था फाउंडेशन ही मुलांच्या प्रगतीसाठी काम करीत असताना कोणतेही शुल्क पालकांकडून आकारणी करेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. परंतु, पालक सभेच्या नावाखाली नियमबाह्य रित्या प्रत्येक विदयार्थ्याकडून २०० रुपयाप्रमाणे पैसे आकारणे, मागणी करणे ही अयोग्य आहे. पालक सभेची जरी मंजूरी असली तरी शासनाने कोणतेही मान्यता दिल्याचे निर्दशनास येत नाही. शासनाच्या परवानगी विना विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पैशाची मागणी करणे नियमबाह्य आहे.

पालक हे त्यांचे पाल्य शाळेत शिकत असल्याच्या कारणास्तव शाळेच्या या कृत्या विरोधात बोलणार नाही किंवा तक्रार ही करणार नाही व याचाच फायदा घेऊन शाळा नियमबाह्य रित्या पैसे वसूल करीत आहे. या सर्व घटनांचा गांभीर्याने विचार करुन तात्काळ वसुल केलेली “फि” विद्यार्थ्यांकडे परत देण्यात यावी व बेकायदेशीर फि घेण्यास मनाई आदेश द्यावेत अन्यथा या विरुद्ध आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी मनसेचे महीबुब सय्यद व अविनाश घोगरे यांनी गटविकास आधिकारी, गटशिक्षण आधिकारी शिरूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शिरुर शहरात दोषी आढळून येणाऱ्या खाजगी शाळांवर तात्काळ कठोर कारवाई करा; नाथा पाचर्णे

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट…

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश!

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

कायम शब्द वगळलेल्या पात्र शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा लागू; दीपक केसरकर