रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड करत असते. म्हणून वडाचे झाड हे जीवनात खूप महत्वाचे आहे.

कोरोना काळात तर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे रामलिंग येथे शुक्रवार (दि 3) रोजी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे. वटपौर्णिमा साजरी करण्यामागे शास्त्रीय कारण पण आहे. परंतु सध्याचा काळात काही महिला भगिनी भावना जपण्यासाठी वडाच्या झाडाची फांदी घरी आणून त्याची पूजा करतात परंतु वटपौर्णिमा साजरी करताना झाडे लावून साजरी केली. तर याचा सर्वांनाच फायदा सर्वांना होईल. प्रत्येक महिलेने दिवशी एक तरी वडाचे झाड लाऊन ते वाढवले पाहिजे. यामुळे धार्मिक रूढी जपत,वडाचे झाड लावत वटपौर्णिमा साजरी करावी असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. यावेळी सविता देशमाने,अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, पुनम औटी, ऋतुजा देशमाने, मिनल रेपाळे, साक्षी कर्डिले तसेच अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.