सणसवाडीत स्वामी समर्थ मंदिरासाठी सहा गुंठे जागा दान

शिरूर तालुका

कोट्यावधीची जागा देणाऱ्या सुरेश हरगुडेंवर कौतुकाचा वर्षाव

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्यासाठी जागेची अडचण असताना गावातील माजी सरपंच सुरेश हरगुडे यांनी मंदिरासाठी तब्बल 6 गुंठे जागा देऊ केली असल्याने आता गावामध्ये मंदिर उभारणीस मोठी मदत होणार आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील माजी सरपंच तथा सोसायटीचे चेअरमन सोनबा हरगुडे व त्यांचे कुटुंबीय श्री स्वामी समर्थ यांचे भक्त असून स्वामींच्या सेवेची इच्छा त्यांच्या कुटुंबियांची असताना गावामध्ये श्री स्वामींचे भव्य मंदिर असावे अशी सर्वांची इच्छा असताना गावामध्ये मंदिर नव्हते, त्यामुले गावामध्ये मंदिर उभारण्याची अनेकांची इच्छा असताना जागेची मोठी अडचण समोर उभी ग्रामस्थांनी मिळून विकत जागा घ्यावी तर जागेला लाखोंचा भाव असे असताना माजी सरपंच सोन्म्बा हरगुडे यांनीच पुढाकार घेत त्यांची कोट्यावधी रुपये किमतीची तब्बल सहा गुंठे जमीन मंदिरासाठी देऊ करत जमिनीचे बक्षीस पत्र देखील करुन दिले आहे.

नुकतेच अक्षय तृतीयाच्या दिवशी मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून गावामध्ये स्वामींचे मंदिर असावे व भक्तांना स्वामीचा आशिर्वाद घेता यावा या हेतूने आपण मंदिरासाठी जागा देऊ केली असल्याचे माजी सरपंच तथा सोसायटीचे चेअरमन सुरेश हरगुडे यांनी सांगितले. तर सुरेश हरगुडे यांनी केलेल्या कोट्यावधीच्या दानमुळे त्यांचे परिसरातून तसेच स्वामी भक्तांकडून कौतुक होत आहे.