Shirur Police Station

मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार: सुरेशकुमार राऊत

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीदरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

शिरूर पोलिस स्टेशन येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना संचालक निवडणूक निर्भयपणे व शांततेत व्हावी म्हणून दिग्विजय आहेर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे व सहायक निंबधक सहकारी संस्था शिरुर शंकर कुंभार यांचे समवेत शिरुर पो. स्टे.चे पोलिस निरिक्षक सुरेशकुमार राऊत, सहा. पो. नि. संदिप यादव यांची पोलिस स्टेशन येथे मिटिंग झाली.

निवडणुकी मध्ये पैशाचे प्रलोभन मतदारांना कोणी दाखवू नये यासाठी सयूंक्त पणे दोन भरारी पथके तयार केली आहेत. भरारी पथका मार्फत ठीक – ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तरी कोणीही मतदारांना पैशाचे प्रलोभन अथवा कोणी मतदानासाठी पैसे वाटप करत असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी घोडगंगा साखर कारखाना न्हावरे तथा जिल्हा निबंधक कार्यालय अथवा शिरूर पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे तसेच सदरची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पाडावी, असे आव्हान शिरुर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

आमदार अशोक पवारांकडून मुद्दे सोडून टीका: आबासाहेब सोनवणे

घोडगंगा निवडणूकीत पैलवान मंडळी ‘त्यांना’ योग्य जागा दाखवतील: रामभाऊ सासवडे

घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे