crime

अहमदनगर हादरले! ऊसतोड मजुराने मुकादमावर झाडल्या गोळ्या…

क्राईम

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलिस स्टेशनला दीड वर्षांपुर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुकादमावर गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस घेत आहेत. या प्रकरणी बाबुलाल पठाण यांनी फिर्याद दिली आहे.

बाबुलाल पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती. म्हणून दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.

पोलिसात दिलेल्या तक्रारीबाबत मनात राग धरून ३ मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात चोरटयांचा हौदोस; प्रशासनाची बैठक…

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

शिरुर शहरात सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न,बंदुकीच्या दस्त्याने कर्मचाऱ्याला मारहाण; पळून जाताना चोरट्यांकडून गोळीबार

शिरुर तालुक्यात युवकावर पिस्तुल रोखून गोळीबार

शिक्रापुरात गोळीबार करणारा अठ्ठेचाळीस तासात जेरबंद