काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

बाहेर ‘भूलभुलैया’ आत ‘डर्टी पिक्चर’

- हिंजवडीच्या हॉटेलमधील प्रकार, बहुतेक हॉटेल मध्यरात्रीनंतरही सुरूच, करमणूक विभागाचे छापे

पुणे। दि. १४ (प्रतिनिधी)
पुण्यातील हिंजवडीचा ‘आयटी हब’ म्हणून ओळख असलेला परिसर. या परिसरातील काही हॉटेलांची अगदी रया गेलेली; तरीही मोटारीतून उच्चभ्रु तरुण-तरुणी येत राहतात. एवढे काय असते या हॉटेलांमध्ये? तर करमणूक कर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये बाहेरून ‘भूलभुलैया’ आणि आतमध्ये ‘डर्टी पार्टी’ चालत असल्याचे उघडकीस आले आहे.
करमणूक विभागाच्या प्रमुख गीतांजली शिर्के यांच्यासह अधिकार्‍यांच्या पथकाने हिंजवडी परिसरातील हॉटेलवर मध्यरात्री छापे टाकले. या हॉटेलांनी लढविलेली शक्कलही या वेळी उघडकीस आली. हॉटेलबाहेर घरगुती पद्धतीचे जेवण, मराठमोळे भोजन अशा पाट्या झळकत होत्या. मात्र, हॉटेलच्या मागच्या बाजूने चारचाकी वाहनांना जाण्यासाठी बाजूलाच एक कच्चा रस्त्याचा मार्ग असल्याचे आढळले. हॉटेलमागे गेल्यानंतर मोटारींच्या पार्किंगसाठी खास व्यवस्था होती. आतमध्ये गेल्यावर वातावरण हळूहळू बदलत जाते. प्रवेशद्वाराशी साध्या दिसणार्‍या हॉटेलमध्ये थेट डिस्कोथेकही पाहायला मिळाला. मिणमिणते दिवे, कंदील अन् झोपड्यासारख्या छोट्या डोममध्ये सिगारेटचे झुरके ओढत मद्याचे पेले रिचविणारी तरुणाई दिसत होती.
करमणूक विभागाच्या पथकाने या आवाजाच्या दिशेने या डोमला चक्रा मारल्या. परंतु, प्रवेशद्वार सापडत नव्हते. अखेर हॉटेलमधील एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने किचनमध्ये नेले. या किचनमधील छोट्या दरवाज्याच्या खुश्कीच्या मार्गातून आतमध्ये नेले. येथे आलिशान सजावट केलेला ‘हॉल’ होता. याच ठिकाणी पाटर्य़ा होतात, असेही सांगण्यात आले.

पोलिसांचा कानाडोळा..
पुण्यात रात्री ११.३0पर्यंतच परवानगी असताना हिंजवडी परिसरातील बहुतेक हॉटेल्स रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत सुरू असल्याचे या छाप्यात आढळले. या सर्व प्रकारावर पोलिसांची कारवाई होते; परंतु, पोलीस हॉटेलकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास आले.

आणखी >>

प्राथमिक शिक्षण आठवीपर्यंत

- मुख्यमंत्र्यांनी दिला गुणात्मक शिक्षणावर भर; शिक्षकांसाठी पात्रता चाचणी

मुंबई। दि. ११ (खास प्रतिनिधी)
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा स्तर लवकरच आठवीपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात शिक्षणाची केवळ संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढीसाठी शिक्षकांसाठी पात्रता चाचणी सक्तीची करावी, अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण विभागास आज केली.
शिक्षणाचा हक्क अभियानाचा प्रारंभ करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, शिक्षण हक्क अधिनियम २00९मुळे प्राथमिक शिक्षणाचा स्तर आठवीपर्यंत करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पात्रतेसह अनेक अडचणी येणार आहेत. शिक्षक किमान पदवीधर हवा. त्यावर मात करावयाची असून, यात लोक सहभाग वाढवून काम करायचे आहे.
राज्याचे सकल उत्पन्न अधिक असले तरी नैसर्गिक साधन संपत्ती तोकडी आहे. त्यामुळे शिक्षणातून कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन शिक्षणसमृद्धीच्या जोरावर आपण प्रगती साधू. शिक्षण विभागाच्या आकडेवारीसाठी वेगळा सांख्यिकी अधिकारी नेमून प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी काढावी. त्यातून आपण नेमके कुठे आहोत, काय करायला हवे हे समजून पायाभूत सुविधा पुरविणे सोपे होईल., असा विश्‍वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, त्यास दज्रेदार शिक्षण मिळावे, हा या अभियानाचा उद्देश असून, हे अभियान एक लोकचळवळ बनेल.
- राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री

आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याची पद्धत न रुचणारी आहे. नापास विद्यार्थ्याला वरच्या वर्गात घालताना तसा शेरा मारायला हवा.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

आणखी >>

नव्या अभ्यासक्रमामुळे शाळांची गुणवत्ता उंचावणार

पुणे। दि. १0 (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षणामध्ये नव्या शैक्षणिक आराखडा लागू करताना मुक्त आणि आनंददायी शिक्षणाला प्राधान्य देण्यात आला आहे त्यामुळे १ एप्रिल २0१३ पासून नव्या अभ्यासक्रमामुळे एकूणच शिक्षणाची गुणवत्ता उंचावणार आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक शिक्षकाला आत्मपरिक्षण करून बदलावे लागेल असे मत राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक श्रीधर साळुंखे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २0१२ मसुदा या विषयावर विभागीय स्तराचे चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्राचे उद्घाटन परिषदेचे संचालक एन. के. जरग यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र. ल. गावडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे संचालक सर्जेराव जाधव, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष हरी शिंदे, विभागीय शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनील कवडे, शिक्षण अधिकारी डी. एन. पाटील, पिंपरी चिंचवड सभापती विजय लोखंडे, शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, नरेंद्र व्यवहारे, शिक्षण तज्ज्ञ सुमन करंदीकर आदी व्यासपीठावर होते. यावेळी सह संचालक डॉ. शकुंतला काळे यांनी अभ्यासक्रम मसुद्याचे सादरीकरण केले.
साळुंखे म्हणाले, ‘‘इंग्रजी झालेली डिएडची बॅच बाहेर पडली तरी त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान खेद जनक असते. त्यामुळेच बाहेरून शिक्षक आपल्याकडे येतात. अशी परिस्थिती असल्यामुळेच शिक्षणाचा अंशत: परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाच्या अभावाचे हे चित्र केवळ भारतातच नव्हे तर जगभर दिसत आहे. राज्यात एकूण १ लाख ८४ शाळा आहेत. यापैकी ७0 हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. गेल्या १0 वर्षात ८ लाख विद्यार्थी यातून कमी झाले आहेत. हा ओढा खासगी शाळांकडे वळत आहे. असे का होत आहे यासाठी शिक्षकांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. पाठय़ पुस्तक म्हणजे अभ्यासक्रम नाही. हे शिक्षकांच्या लक्षात येणे फार गरजेचे आहे. याच धरतीवर इ-लर्निंग राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच सुरु करत आहोत. शिक्षणातून माणुस घडविणे हा उद्देश आहे. शिक्षकांनी आत्मपरीक्षण करत कामाचा दृष्टीकोन बदलावा. आव्हाने पेलणारा विद्यार्थी तयार व्हायला हवा.’’
जरग म्हणाले, ‘‘सामाजिक दृष्टीकोन लक्षात घेऊन अभ्यासक्रम केला आहे. मुल्य शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, मानवी हक्क, शंततेसाठी शिक्षण यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. हा अभ्यासक्रम बालस्नेही असून यात २ हजार तज्ज्ञ तयार करण्यात येणार आहेत. तालुक्यातील शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारा संपर्क साधण्यात येईल.’’
प्रास्ताविक सहसंचालक दिनकर पाटील केले. सुत्रसंचालन सुजाता लोहकरे, अनिल गुंजाळ यांनी केले.

आणखी >>

आता शेतकर्‍याला पत्नीच्या संमतीशिवाय कर्ज नाही

कृषीमंत्री विखे पाटील यांचे सुतोवाच
अमरावती। दि. ८ (प्रतिनिधी)- मध्यवर्ती बँका हय़ा शेतकर्‍यांच्या हितासाठी असल्या तरी आता पत्नीच्या संमतीशिवाय शेतकर्‍यांना कर्जपुरवठा दिला जाणार नाही, असे सुतोवाच राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा या बाबीचे स्वागत केले.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळय़ाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषीमंत्री बोलत होते. उद्घाटक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ,प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले,‘ सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पडल्याने मध्यवर्ती बँक, सहकार सोसायट्या बंद करण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. मध्यवर्ती बँकांसमोर खासगी बँकांची तगडी स्पर्धा आहे. बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी सहकार क्षेत्राने पुढाकार घ्यावा. बचत गटांची कर्जवसुली ९५ टक्के आहे. जे धोरण शेतकर्‍यांसाठी लागू झाले तेच कर्जपुरवठय़ाचे धोरण महिला बचत गटांसाठी लागू केले जाईल, असेही कृषीमंत्री म्हणाले. याबाबत येत्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

आणखी >>

शिष्यवृत्ती मिळवा सायकल घ्या!

पुणे। दि. ५ (प्रतिनिधी)
शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्सहान देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा जि.प. अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी पुण्यात झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात केली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाला जिल्हा शिक्षक पुरस्कार, १३ शिक्षकांना प्रोत्सहान पुरस्कार आणि पाच पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणार्‍या तब्बल ७५ शिक्षकांचा खास सत्कार करण्यात आला.
याशिवाय आंबेगाव तालुक्यातील परांडा व भोर तालुक्यातील उत्रौली या दोन उत्कृष्ट शाळांना अध्यक्ष चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप कंद, बांधकाम सभापती भाऊसाहेब करे, समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, कृषी सभापती मनिषा कोरेकर, महिला व बालकल्याण सभापती मनिषा लव्हे, मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल कवडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी उत्तम करपे, शिक्षणाधिकारी प्राथमिक दत्तात्रय शेंडकर, माध्यमिक शिक्षाणाधिकारी बी.एस.आवारी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, जिल्ह्यात तब्बल १३ हजार शिक्षक असताना जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी केवळ ४९ प्रस्ताव येतात. यात प्रामाणिकपणे काम करणारे अनेक शिक्षक प्रस्ताव पाठविण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे यापुढे प्रस्ताव न मागविता तेरा हजार शिक्षक डोळ्यासमोर ठेऊन वर्षभर मूल्यांकन करून पुरस्कार देण्याची खरी गरज आहे. आदर्श समाज घडविण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो, पण सध्या शिक्षक या कामामध्ये काही प्रमाणात कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दज्रेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी अनिल कवडे व शेंडकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
पूर्वीच्या काळाइतकी आदराची प्रतिमा सध्याच्या शिक्षकांची राहिलेली नाही. परंतु आजही आदर्श समाज घडविण्याची ताकद केवळ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांमध्येच आहे. गेल्या काही वर्षांत समाजात शिक्षकांविषय गैरसमज वाढतच आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आजचा शिक्षण दिन खर्‍या अर्थांने चिंतनदिन म्हणून साजरा करण्याची गरज आहे. - दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्ष

आणखी >>

गुणवत्तेवर मिळणार चित्रपटांना अनुदान

पुणे। दि. २ (प्रतिनिधी)
‘‘आता चांगल्या मराठी चित्रपटांचे श्रेणीत वर्गीकरण करून चित्रपटाच्या दज्र्यावरच त्याला अनुदान मिळणार की, नाही हे ठरणार आहे. यापूर्वी ‘क’ श्रेणीच्या चित्रपटांनाही ५ लाख रुपये अनुदान मिळत होते; परंतु हे लवकरच बंद होणार आहे. चित्रपटाचे १0 मुद्यांच्या आधारे परीक्षक टीकात्मक विश्लेषण करून त्यावर गुण दिले जातील व श्रेणी ठरणार आहे. याविषयीचा जीआर लवकरच देण्यात येणार आहे.’’ असे फिल्म सिटीचे कार्यकारी संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन (महाराष्ट्र चॅप्टर) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘‘डोळस व जाणकार प्रेक्षक घडविणे आवश्यक आहे. आजकाल माध्यमांद्वारे जो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतो ते केवळ पेज ३ संस्कृती व करमणूक पोहोचवते. परंतु चित्रपट त्या पलिकडे आहे. हॉटेलिंग, शॉपिंग आणि सिनेमा हे एका स्तरावर आणले जाते; मात्र चित्रपट ही कला आहे याचा विसर लोकांना पडत चालला आहे. हे क्षेत्र म्हणजे व्यवसायापलीकडे अनेक कलांचा मेळ आहे. कला माध्यमे माणसाला अधिक सुजाण करतात.’’

आणखी >>

पहिली ते आठवी अभ्यासक्रम बदलणार

मुंबई। दि. २४ (विशेष प्रतिनिधी)
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यास पुढील वर्षापासून सुरुवात होणार असून, या पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मसुदा तयार झाला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज दिली. या पुनर्रचित अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान, कार्यक्षमता आणि बुद्धीचा विकास होऊन शैक्षणिक दर्जा व विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकता वाढेल, असा विश्‍वास दर्डा यांनी व्यक्त केला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत यासाठी राज्यस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना समिती नेमण्यात आली होती. तसेच, विविध ११ विषयांचे अभ्यासक्रम त्या-त्या विषयातील नामवंत तज्ज्ञांचा समावेश असलेल्या अभ्यास मंडळांकडून तयार करून घेण्यात आले. त्यामध्ये डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान), वसंत आबाजी डहाके (मराठी), डॉ. हेमचंद्र प्रधान (गणित) आदी ख्यातकीर्त व्यक्तींनी या मसुद्याचे परीक्षण करून आपले अभिप्राय दिलेले आहेत.

काय असेल अभ्यासक्रमात..
- विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण म्हणजे घोकंपट्टी या पूर्वापार समजाला मूठमाती देण्यावर भर
- शारीरिक व मानसिक क्षमतांचा परिपूर्ण विकास, अभ्यासाच्या भीती व दडपणातून मुक्तता हेही उद्दिष्ट
- ज्ञानाचा संबंध शाळेबाहेरील जीवनाशी जोडला जाणार
- अभ्यासक्रम पाठय़पुस्तकांच्या र्मयादेपलीकडे जाणार

तीन वर्षांत अंमलबजावणी
इयत्ता पहिली आणि दुसरीचा पुनर्रचित अभ्यासक्रम जून २0१३पासून लागू केला जाईल. इयत्ता तिसरी, पाचवी आणि सातवीचा जून २0१४पासून तर इयत्ता चवथी, सहावी आणि आठवीचा पुनर्रचित अभ्यासक्रम २0१५पासून लागू केला जाईल. अशा प्रकारे नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तीन वर्षांत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

आणखी >>

शाळा व्यवस्थापन समित्या सल्लय़ापुरत्या

यदु जोशी। दि. १७ (मुंबई)
खासगी अनुदानित शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांना दिलेले व्यापक अधिकार कमी करून यापुढे त्या केवळ सल्लागाराच्या भूमिकेत असतील, अशी महत्त्वपूर्ण दुरुस्ती बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमात केंद्र सरकारने केली आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २0 हजार ४५५ खासगी अनुदानित शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांचे महत्त्व जवळपास संपुष्टात आले आहे. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संचालित आणि अनुदानित शाळांना शाळा विकास आराखडा तयार करण्याची सक्ती शिक्षणाचा हक्क अधिनियमाद्वारे करण्यात आलेली होती. तथापि, अनुदानित शाळांना यापुढे अशी सक्ती नसेल, अशी दुरुस्तीही अधिनियमात करण्यात आली आहे. शाळेचे मूळ व्यवस्थापन आणि पालकांच्या सहभागातून निर्माण करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समित्या यामधील संघर्षाला त्यामुळे पूर्णविराम मिळणार आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांचे वर्चस्व संपुष्टात आल्याचा आनंद मूळ शाळा व्यवस्थापनास मात्र नक्कीच होणार आहे.
खासगी विनाअनुदानित शाळांना शाळा व्यवस्थापनाची आधीपासूनच सक्ती नाही. अशा शाळांची संख्या १२ हजार ११८ आहे. प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकूण सदस्यांपैकी ७५ टक्के सदस्य हे बालकांचे पालक असतात. दोन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ किंवा बालविकास तज्ज्ञ, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापनाचे सदस्य यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश असतो. शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असतात.
असे होते
अधिकार
शाळेच्या जमा-खर्चाचा लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
माध्यान्ह भोजन व इतर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे.
शिक्षणाचा हक्क अधिनियमाचे तंतोतंत पालन होते की नाही यावर लक्ष ठेवणे.

आणखी >>

आता शेतीलाही पाणी

पुणे। दि. १४ (प्रतिनिधी)
खडकवासला प्रकल्पात ७३ टक्के म्हणजे पुरेसा पाणीसाठा झाल्याने आता शेतीसाठी देखील पाणी सोडण्यात येणार आहे. दुष्काळाच्या कालावधीत तोडण्यात आलेली शेती पंपांचे कनेक्शन पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट्ट यांनी पत्रकारांना दिली.
जिल्ह्यातील धरणांच्या पाणी स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित अधिका-यांची बैठक घेतली. यामध्ये कुकडी प्रकल्प वगळता अन्य सर्व प्रकल्पांमधून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सुचना पवार यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली शेती पंपांची कनेक्शन पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शेतक-यांना काही प्रमाणात तरी दिलास मिळण्यास मदत होईल. कालव्यामधून पाणी सोडल्यास शेतक-यांना किमान जनाव-यांसाठी तरी चा-याची लावगड करत येणार आहे.
दरम्यान दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर खडकवासला प्रकल्पातील पाण्यावरुन पुणेकर विरुध्द ग्रामीण भागातील नागरिक असा चांगलाच वाद रंगला होता. यात दौंड नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर परस्थिती निर्माण झाली असताना देखील दौंडला पाणी सोडण्यास पुणेकरांनी विरोध केला होता. परंतु आता खडकवासला प्रकल्पात २१.३५ टीएमसी म्हणजे ७३ टक्के पाणी साठा झाला आहे. यातमध्ये पुणे शहरासाठी वर्षांला किमान १४ टीएमसी पाणी लगते. त्यामुळे मुठा-मुठा कालव्यातून आता शेतीसाठी देखील पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या कालव्यातून सुमारे १४ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. यात
सुरुवातील कालव्या लगत पिण्याच्या पाण्यासाठी असलेले सर्व तलाव भरुन घेण्यात येणार आहेत.
खडकवासला प्रकल्पांत २१.३५ टीएमसी साठा
ल्ल धरण क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणांच्या पाणी पातळीत तुरळक वाढ झाली. खडकवासला प्रकल्पातील साठा २१.३५ टीएमसी (अब्ज घनफूट) झाला आहे. खडकवासल्यातून कालव्याद्वारे १३९२ क्युसेक पाणी मंगळवारी सोडण्यात आले.
ल्ल खडकवासला प्रकल्पातील वरसगाव धरण परिसरांत १0, पानशेत व टेमघरला प्रत्येकी ९ मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव धरणातील साठा ८.९५, पानशेत ८.११ व टेमघरचा साठा २.३१ टीएमसी झाला आहे. खडकवासल्यात १.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. या चारही धरणांच्या पाणीसाठय़ाची टक्केवारी ७३.२४ टक्के झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने या धरणाच्या साठय़ात चोवीस तासांत केवळ पाव टीएमसीने (0.२५) वाढ झाली.
ल्ल जिल्ह्यातील पवना धरण क्षेत्रांत १४, माणिकडोह ३, भामाआसखेड ७ मिलिमीटर पाऊस झाला. इतर प्रमुख धरण क्षेत्रांत पावसाने पाठ फिरविली. पवना धरणाचासाठा ६.४0, माणिकडोह ३.५४, भामाआसखेड ७, भाटघर १८.५४, नीरा-देवधर ९.७ व वीर धरणाचा साठा ९ टीएमसी झाला आहे.

आणखी >>

१.३७ कोटी शेतकर्‍यांना विम्याचे कवच

मृत शेतकर्‍याच्या कुटुंबाला विमा कंपनीतर्फे
एक लाख रुपये, राज्य सरकारचा निर्णय

कमलाकर जोशी। दि. १0 (नांदेड)
वीज पडणे, सर्पदंश, विंचू चावणे, विजेचा शॉक इत्यादी आपत्तीमुळे तसेच रस्ता अपघात, वाहन अपघात, इतर कोणत्याही अपघातामुळे राज्यातील शेतकरी अपघात मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबाला विमा कंपनीतर्फे आर्थिक लाभ देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य शासनाने क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी घेतला आहे. राज्यातील १ कोटी ३७ लाख शेतकरी कुटुंबाला या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
शेतकरी कुटुंबातील कर्ता व्यक्ती नैसर्गिक आपत्तीत मृत्यू पावल्यास राज्य शासन त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देत असे. राज्य शासनाने शेतकरी कुटुंबाला अशा परिस्थितीत आर्थिक मदत देण्यासंबंधात आतापर्यंत ९ निर्णय घेतले. परंतु अपघाती मृत्यू पावलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळत नसे. त्यामुळे या निर्णयात बदल करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. तसेच यापूर्वी शेतकर्‍यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास किंवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध असणार नाही. या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असणार आहेत. शेतकर्‍यांच्या विमा उतरविण्यासंबंधात कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली
८ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात
आली. त्यात २0१२-१३ या एक वर्षाकरिता प्रतिशेतकरी २३ रुपये इतका विमा हप्ता कंपनीला देण्याचे मान्य करण्यात आले.
योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९0 दिवसापर्यंत तालुका कृषी अधिकार्‍याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय सर्मथनीय कारणासह ९0 दिवसानंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक असणार आहेत. प्रस्ताव विहीत मुदतीत सादर केले नाही तर या कारणास्तव विमा कंपन्यांना प्रस्ताव नाकारता येणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने राज्यातील १ कोटी ३७ लाख शेतकर्‍यांच्या विम्यापोटी ३१ कोटी ५१ लाख रुपये भरणा केला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी कुटुंबातील कर्ता व्यक्ती नैसर्गिक आपत्ती अथवा अपघातात मृत्युमुखी पडल्यास तसेच त्यास अपंगत्व आल्यास विमा योजनेतर्फे आर्थिक लाभ देता येईल. या योजनेला शेतकरी जनता अपघात विमा असे नाव देण्यात आले आहे. १५ ऑगस्ट २0१२ ते १४ ऑगस्ट २0१३ या एक वर्षाच्या कालावधीकरिता ही योजना चालू ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या विम्याअंतर्गत शेतकर्‍यांचा एखादा अवयव अपघातात निकामी झाल्यास ५0 हजार रुपये, दोन अवयव गेल्यास एक लाख रुपये, कायमचे अपंगत्व अथवा मृत पावल्यास त्या कुटुंबाला १ लाख रुपयापर्यंत आर्थिक लाभ देण्यात येतो.
- भीमराव रामीनवार,
विकास अधिकारी,
नॅशनल इंशुरन्स कंपनी

आणखी >>

किसान क्रेडिट कार्ड नियम शिथिल!

परतफेडीची र्मयादा शिथिल, रिझर्व्ह बँकेचा पुढाकार

मुंबई। दि.८ (प्रतिनिधी)
कमी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा शेतकर्‍यांना मुकाबला करता यावा, यासाठी पुढाकार घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्ड परतफेडीसंदर्भातील नियम शिथिल केले आहेत.
किसान क्रेडिट कार्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांत बदल करून रिझर्व्ह बँकेने कार्डधारकांना एक वर्षाच्या आत परतफेड करण्याच्या बंधनातून मुक्त केले आहे. तसेच बँकांना परतफेडीची मुदत निश्‍चित करण्याचे स्वातंत्र्य
दिले आहे. या निर्णयाचा १0 कोटींपेक्षा अधिक किसान क्रेडिट कार्डधारक शेतकर्‍यांना फायदा होईल. पिकांची पेरणी आणि विपणन अवधीनुसार बँकांना परतफेडीची मुदत निश्‍चित करता येईल.
किसान क्रेडिट कार्डचा उपयोग पीक विमा अनिवार्य करण्यासाठीही केला जाऊ शकतो. आधी ही सुविधा नव्हती, असे रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटले आहे. किसान क्रेडिट कार्डधारकांना एटीएममधून पैसे काढता येतील. तसेच मालमत्ता विमा, वैयक्तिक दुर्घटना विमा आणि आरोग्य विम्याचाही लाभ मिळत राहील, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून कृषी उत्पादनाचे रक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे, असे वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते.
शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून वेळेत आणि पुरेशी मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानुसार १९९८-९९ मध्ये सरकारने
किसान क्रेडिट कार्डची योजना सुरू केली होती.

आणखी >>

नेत्र दिले दान

जखमी सौरभ तळेले याचा मृत्यू

देहूरोड। दि. ७ (वार्ताहर)
रावेतहून डी. वाय. पाटील रस्त्याने आकुर्डीच्या दिशेने भरधाव जाणार्‍या दुचाकीस्वाराचा तोल जाऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सौरभ दिलीप तळेले (१९) असे या तरुणाचे नाव आहे. तो ताथवडेच्या शाहू कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकत होता. मैत्रीदिनाच्या दिवशीच मृत्यू झालेल्या सौरभचे वडिलांच्या इच्छेखातर नेत्रदान करण्यात आले.
अपघात प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास सौरभ रावेतकडून डी. वाय. पाटील आकुर्डीच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच १४ सीए २२0२) चालला होता. दरम्यान एका लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून तो ३0 फुटांपर्यंत फरफटत गेला. रस्त्याच्या बाजूला उभ्या एका मोटारवर आदळून तो गंभीर जखमी झाला. देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीतील वर्कर्स युनियनचे संजय पाटील व त्यांच्या पत्नी, रवींद्र करवडे, अमित पोक्षे यांनी सौरभला रिक्षामधून निगडीतील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे तीनला त्याचा मृत्यू झाला.
तरुण मुलगा गेल्याने तळेले कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातूनही सावरत त्याच्या वडिलांनी सौरभचे नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना लायन्स क्लबचे अनिल झोपे, अँड. शोभा कदम यांच्या सहकार्याने नेत्रदान करण्यात आले. आकुर्डीत वास्तव्यास असलेले तळेले कुटुंब मूळचे जळगाव जिल्ह्यातील बामनोद या गावचे. सौरभच्या पश्‍चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. वडील थरमॅक्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.

आणखी >>

‘गणपती स्पेशल’ एसटी गाड्या

गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळातर्फे विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार असून १४ ते १९ सप्टेंबर या कालावधीत त्या सोडण्यात येतील, असे एसटी महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

आणखी >>

डी.एड.साठी यंदा ‘स्पॉट अँडमिशन’

अरुण लोहकरे। दि. ३ (पुणे)
यंदा प्रथमच डी.एड.साठी स्पॉट अँडमिशन मिशन राबविण्यात येणार आहे. राज्यात डी.एड.च्या ९0,१२५ जागा आहेत. पैकी व्यवस्थापन कोटा म्हणून साधारणपणे राज्यभरात २0 हजार जागा होतात. २९१ अध्यापक विद्यालयांची कोर्ट केस सुरू असल्याने या विद्यालयांमध्ये यंदा अँडमिशन नव्हते. या २९१ विद्यालयांमध्ये जवळपास १५ हजार अँडमिशन्स धरले तर उरलेल्या ५५ हजार जागांसाठी सगळ्या फेर्‍यांमधून केवळ २२,३१९ प्रवेश झाले. तब्बल २८,७३0 जागा अजूनही रिक्त आहेत.
यामध्ये मराठीत सर्वाधिक २७१३३, इंग्रजी - १0२४, हिंदी - २0३, उर्दू - २६६, कन्नड - १0४ जागा आहेत. यात मुंबई विभाग - २४८0, पुणे - ७२८६, नाशिक २000, कोल्हापूर - १९६७, औरंगाबाद - ३११४, लातूर - ३५४७, अमरावती - १५४४, नागपूर - ६१३0 तर कोकण विभागात ६६२ जागा रिक्त आहेत. डी.एड.च्या जागा प्रथमच मोठय़ा प्रमाणावर रिक्त असल्याने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, मान्यतेनंतर याची अंमलबजावणी होईल, असे शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे यांनी सांगितले.
ही परिस्थिती का उद्भवली?
राज्यातील शिक्षकांची संख्या जास्त आणि मागणी कमी असा प्रकार गेल्या ५-६ वर्षांपासून सुरू आहे. २00४-0५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील १३९ डी.एड. महाविद्यालयांची १५,५२७ एवढी प्रवेश क्षमता होती. दरम्यानच्या काळात एनसीटीईने राज्यात भरमसाठ विनाअनुदानित डी.एड. कॉलेजांना मान्यता दिली.
२00४ ते २00९ या ६ वर्षांत राज्यात १0५१ डी.एड. कॉलेजीस वाढली आणि २00८-0९ या शैक्षणिक वर्षात प्रवेश क्षमता ८८,३३५ एवढी झाली. २0१२-१३ मध्ये राज्यात १४0५ डी.एड. कॉलेजीसमध्ये ९0,१२५ प्रवेश क्षमता झाली; म्हणजेच गेल्या ७ वर्षांचा विचार करता प्रवेश क्षमता जवळपास ६ पट वाढली आहे.

काय असणार ‘स्पॉट अँडमिशन’?
ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत अशा अध्यापक विद्यालयांनी जाहिरात देवून १0 दिवसांत या जागा भरायच्या आहेत. यासाठी शासनाचे निकष पाळणे मात्र बंधनकारक आहे. २९१ महाविद्यालये वगळता राज्यातील १,४0५ पैकी ज्या विद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत, त्यांच्यासाठी हे मिशन असणार आहे. या विशेष मोहिमेतूनही जागा न भरल्यास विना अनुदानित शिक्षण संस्था अडचणीत येणार आहेत.

आणखी >>

शेतकर्‍यांना निम्म्या दरात डिझेल

नवी दिल्ली। दि. ३१ (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशात सरासरीच्या २0 टक्के कमी पाऊस झाल्याने सरकारने मंगळवारी दुष्काळग्रस्त राज्यांसाठी १९00 कोटींचे पॅकेज जाहीर केले. उभे पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना डिझेलवर ५0 टक्के सबसिडी देण्याची घोषणाही केंद्र सरकारने केली. कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दुष्काळविषयक मंत्रिगटाने हा निर्णय घेतला.
डिझेलवरील सबसिडीचा भार केंद्र व राज्य सरकार निम्मा-निम्मा उचलणार असल्याचे सांगतानाच पवार म्हणाले की, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या राज्यांना एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेसाठी समितीने १४४0 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा यांना पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी ४५३ कोटी रुपये मंजूर केले. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थानला यातले ३८ कोटी लगेच देण्यात येत आहेत.

आणखी >>

अष्टविनायक यात्रांसाठी एसटीची ‘दर्शन यात्रा’

श्रावण महिन्यात शहराजवळील प्रमुख मंदिरांच्या दर्शनासाठी सुरू करण्यात आलेल्या एसटीच्या बससेवेला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर, आता एसटी महामंडळाच्या सेवेच्या माध्यमाने अष्टविनायक यात्रेसाठी ‘दर्शन यात्रा’ ही विशेष बस सुरू करण्यात येणार आहे.

आणखी >>

शेतीचा विकासदर ‘लॅपटॉप’च्या क्लिकवर!

- राज्यात ६ कोटींचे वाटप, प्रत्येक मंडल कार्यालयास पुरवठा

विश्‍वास पाटील। दि. २९ (कोल्हापूर)
कृषी विकासाच्या योजनांना गती देता यावी व मुख्यत: फलोत्पादनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मंडल अधिकारी व कृषि सहायकास लॅपटॉप देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यातील ८८५ मंडल कृषी कार्यालयांना लॅपटॉप पुरविण्यात येत आहेत.
एकूण १७७0 लॅपटॉप पुरविण्यात येणार असले तरी निधीच्या उपलब्धतेनुसार पहिल्या टप्प्यात १५५८ लॅपटॉपचा पुरवठा करण्यात येत आहे. एका लॅपटॉपची किंमत ४३२00 रुपये असून शासन त्यासाठी ६ कोटी रुपये खर्च करत आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सायबर एक्स्टेंशन (संगणकाद्वारे फलोत्पादन प्रचार व प्रसार) योजनेतंर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यभर या संचांचे वाटप दोन जुलैपासून सुरू झाले आहे.
त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही संबंधित कंपनीमार्फत देण्यात येत आहे. हे लॅपटॉप कृषी विस्ताराच्या कामासाठी देण्यात येत असल्याने वरिष्ठ कार्यालयातील अधिकार्‍यांनी ते स्वत:कडे ठेवून घेऊ नयेत, अशा सक्त सूचना फलोत्पादन विभागाच्या संचालकांनी दिल्या आहेत. लॅपटॉपचे वाटप व त्यानंतरची सेवा नीट मिळावी यासाठी जिल्हा स्तरावर तपासणी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.

आणखी >>

राजेशमुळेच माझा भाव वधारला!- अमिताभ

मी पहिल्यांदा त्याला पाहिलं ते एका फिल्म मॅगझिनमध्य़े, बहुधा फिल्मफेअर. फिल्मफेअर माधुरी टॅलेन्ट स्पर्धेचा- नंतर ज्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि बाद झालो- त्या स्पर्धेचा तो विजेता होता. त्यानंतर तो भेटला आराधना चित्रपटातून. नवी दिल्लीत कनॉट प्लेसमधल्या रीवोली थिएटरमध्ये आई मला सोबत घेऊन गेली होती. त्यावेळचे ते गच्च भरलेले थिएटर आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची तुलनाच होऊ शकणार नाही.

आणखी >>

अच्छा तो हम चलते है..

बॉलिवूडचा पहिला महानायक राजेश खन्ना यांच्या पार्थिवावर आज जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या हजारो चाहत्यांनी साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या काकाचा अखेरचा निरोप घेतला. अक्षयकुमारचा मुलगा आणि राजेश खन्ना यांचा नातू आरव याने त्यांना मुखाग्नी दिला. अच्छा तो हम चलते है या त्याच्या गाजलेल्या गाण्यांच्या ओळी प्रत्येकाच्या मनात रेगाळात राहिल्या.

- अमिताभ बच्चन यांना राजेश खन्नांचे पार्थिव पाहून रडू कोसळले, त्याप्रसंगी अभिषेकने त्यांना आधार दिला. स्मशानातही बच्चन पितापुत्रांनी हजेरी लावली. मात्र, तेथून निघताना चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याने त्यांना चालतच जावे लागले.

टाइम अप हो गया.. पॅक अप!
हे होते राजेश खन्ना यांचे अखेरचे शब्द. खन्ना यांच्या एका निकटवर्तीयाने ते अमिताभ यांना सांगितले आणि आज आपल्या ब्लॉगवर त्यांनी ते उघड केले.

चाहत्यांवर लाठीचार्ज!

मुंबई। दि. १९ (प्रतिनिधी)
राजेश खन्ना यांच्या पार्थिव देहाच्या अंत्ययात्रेदरम्यान जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला.
खन्ना यांच्या पार्थिव देहाची आशिर्वाद या निवासस्थानपासून जुहू येथील वैकुंठधामपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली होती. खन्ना यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेता यावे म्हणून चाहत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. अंत्ययात्रेदरम्यान वाहतूककोंडी होऊ नये म्हणून रस्त्यावर बॅरिकेट्सही लावले होते. त्याशिवाय अंत्ययात्रेच्या मार्गादरम्यान पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला.
खन्ना यांच्या अंत्ययात्रेत खुद्द बिग बी आणि अभिषेक बच्चन सामील झाले होते. परिणामी खन्ना यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासह बच्चन यांना पाहण्यासाठी मोठया प्रमाणावर जनसागर उसळला होता. रस्त्याच्या कडेला, वृक्षांच्या फांद्या, पादचारी पूल आणि जिथे जागा मिळेल तिथे चाहत्यांनी गर्दी केली होती. रस्त्यावर जमा झालेल्या चाहत्यांना आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ येत होते. बच्चन यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी चाहत्यांना गर्दीदरम्यान बराचवेळ आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढत्या गर्दीला थोपवणे पोलिसांच्या आवक्याबाहेर जात होते.
सरतेशेवटी रस्त्यांच्या मध्यभागी आलेल्या जनसागराला थोपवण्यासाठी पोलिसांनी प्रथमत: शब्दांचा मारा केला. मात्र गर्दीला आवरणे कठीण असल्याचे लक्षात येताच पोलिसांना मिठीबाई कॉलेज परिसरात लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जदरम्यान जनसागर रस्त्यावरच सैरावेरा पळत सुटल्याने अनेकांना दुखापत झाली.

खुश रहना मेरे यार..
वांद्रे येथील कार्टर रोड येथून निघालेली ही अंत्ययात्रा दीड तासाचा प्रवास करून पवनहंस स्मशानभूमीत पोहोचली. या संपूर्ण अंत्ययात्रेत ‘काका’च्या दर्शनासाठी चाहत्यांचा जनसागर लोटला होता. अंत्ययात्रा जात असलेल्या भागातील दुकाने आणि कार्यालये बंद होत होती.
ट्रकमध्ये त्यांची पत्नी डिंपल, मुलगी रिंकी आणि दोन जावई होते. अक्षय कुमारसोबत त्याचा मुलगा आरवसुद्धा होता. आरव आजूबाजूचे वातावरण पाहून तो भांबावला होता व सतत आपल्या वडिलांना कवटाळून तो रडत होता.
सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास आशीर्वाद बंगल्याहून राजेश खन्ना यांची अंत्ययात्रा सुरू झाली. पांढर्‍या फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये काचेच्या पेटीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या चेहर्‍याकडे पाहता समाधानाने डोळे मिटल्याची जाणीव होत होती.
वाटेत त्यांचे अनेक चाहते पुष्पहार अर्पण करीत होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. अंत्ययात्रेआधी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आशीर्वाद बंगल्यावर जाऊन आदरांजली वाहिली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील
करण जोहर, राणी मुखर्जी, यश चोप्रा, रणजीत, सुधीर मिश्रा, शक्ती कपूर, रमेश सिप्पी, रजा मुराद या सर्वांनी स्मशानात उपस्थिती दर्शविली. राजेश खन्ना यांचा सरणावरचा देह पाहून त्यांची प्रेयसी असलेल्या अंजू महेंद्रु यांना अश्रू आवरले नाहीत.

आणखी >>

राजेश खन्ना - फिल्मोग्राफी

राजेश खन्ना हे गुरूदत्त यांना आपले आदर्श मानत होते. ‘दुश्मन’ चित्रपटात मीरा कुमारी यांच्यासोबत खन्ना यांनी पहिल्यांदा काम केले होते. या चित्रपटांत काम करण्याचे मानधनही खन्ना यांनी घेतले नव्हते.

१९७३ साली बीबीसी लंडनने राजेश खन्ना यांच्यावर एका डॉक्युमेंट्री फिल्मची निर्मिती केली होती. यामध्ये खन्ना यांना बॉम्बे सुपरस्टार म्हणून ओळख देण्यात आली होती. बीबीसीने हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या कलाकारावर डॉक्युमेंट्री फिल्म तयार करण्याची ही पहिलीच वेळ होती.

१९६६ आखिरी खत, १९६७ राज, १९६७ बहारों के सपने, १९६७ औरत, १९६८ श्रीमान जी, १९६९ आराधना, १९६९ इत्तफाख,
१९६९ डोली, १९६९ बंधन, १९६९ दो रास्ते, १९७0 खामोशी, १९७0 द ट्रेन
१९७0 सच्चा-झूठा, १९७0 सफर, १९७१ कटी पतंग, १९७१ आनंद, १९७१ आन मिलो सजना, १९७१ अंदाज, १९७१ र्मयादा, १९७१ छोटी बहू, १९७१ हाथी मेरे साथी, १९७१ गुड्डी, १९७१ महबूब की मेहंदी, १९७१ बदनाम फरिश्ते, १९७२ दुश्मन, १९७२ अमर प्रेम, १९७२ अपना देश, १९७२ दिल दौलत दुनिया, १९७२ बावर्ची,१९७२ जोरु का गुलाम, १९७२ मेरे जीवनसाथी, १९७२ मालिक, १९७२ शहजादा, १९७२ अनुराग, १९७३ राजा रानी, १९७३ दाग, १९७३ नमक हराम, १९७३ आविष्कार, १९७४ हमशक्ल, १९७४ आपकी कसम, १९७४ प्रेमनगर, १९७४ अजनबी, १९७४ रोटी, १९७४ बढ.ती का नाम दाढ.ी, १९७५ प्रेम कहानी, १९७५ आक्रमण, १९७६ महाचोर, १९७६ बंडलबाज, १९७६ महबूबा, १९७७ त्याग, १९७७ कर्म, १९७७ छैला बाबू, १९७७ चलता पुर्जा, १९७७ अनुरोध , १९७७ आशिक हूं बहारों का, १९७७ आईना, १९७७ हत्यारा, १९७७ पलकों की छांव में, १९७८ चक्रव्यूह, १९७८ बाबा भोलाराम, १९७८ नौकरी, १९७९ तिल तिल देखा, १९७९मुकाबला, १९७९ जनता हवलदार, १९७९ शैतान मुजरिम, १९७९ अमरदीप, १९७९ मजनू, १९७९ प्रेम बंधन, १९८0 फिर वोही रात, १९८0 बंदिश, १९८0 थोड.ी सी बेवफाई, १९८0 रेड रोज, १९८0 आंचल, १९८१ कुदरत, १९८१ धनवान, १९८१ दुश्मन दोस्त, १९८१ भरोसा, १९८१ फिफ्टी फिफ्टी, १९८१ खून और पानी, १९८२ दिले नादान, १९८२ अशांति, १९८२ राजपूत, १९८२ धर्मकांटा, १९८२ अय्याश, १९८३ जानवर, १९८३ निशान, १९८३ सौतन, १९८३ अवतार, १९८४ अगर तुम न होते, १९८३ डिस्को डांसर, १९८४ पापी पेट का सवाल है, १९८४ धर्म और कानून, १९८४ आवाज, १९८४ आज का एमएलए, १९८४ आशा ज्योति, १९८४ मकसद, १९८४ नया कदम, १९८५ ऊंचे लोग, १९८५ जमाना, १९८५ हम दोनों, १९८५ मास्टरजी, १९८५ इंसाफ मैं करुंगा, १९८५ दुर्गा, १९८५ आखिर क्यों, १९८५ अलग अलग, १९८५ बाबू, १९८५ आरपार, १९८५ बाएं हाथ का खेल, १९८५ आवारा बाप, १९८६ शत्रू, १९८६ ओम, १९८६ मोहब्बत की कसम, १९८६ अंगारे, १८९६ अमृत, १९८६ अधिकार, १९८६ निशांत, १९८६ अनोखा रिश्ता, १९८७ नजराना, १९८७ अवाम, १९८७ गोरा, १९८८ वो फिर आएगी, १९८८ विजय, १९८९ मैं तेरा दुश्मन, १९८९ ममता की छांव में, १९८९ पुलिस के पीछे पुलिस, १९८९ घर का चिराग, १९९0 स्वर्ग, १९९0 जय शिव शंकर, १९९0 दुश्मन, १९९१ घर परिवार, १९९१ रुपैया दस करोड., १९९१ बेगुनाह, १९९४ खुदाई, १९९५ किस काम के ये रिश्ते, १९९६ सौतेला भाई, १९९६ आ अब लौट चलें, २00१ प्यार जिंदगी है, २00६ जाना, २00७ वफा

राजेश खन्ना यांनी रसिक प्रेक्षकांच्या तीन पिढय़ांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जणू ‘सुवर्णयुग’ अवतरले होते.
- के. शंकरनारायणन (राज्यपाल)
राजेश खन्ना यांच्या निधनाने आपण हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणार्‍या पहिल्या सुपरस्टारला मुकलो आहोत. त्यांच्या निधनाने अभिनयाच्या माध्यमातून तरल भूमिकांचे एक पर्व संपले आहे. १९९२ मध्ये पोटनिवडणुकीतून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले होते. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी एकही नवीन चित्रपट स्वीकारला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. १९९२ ते ९६ दरम्यान आम्ही लोकसभेत सहकारी म्हणून एकत्र होतो. हळव्या आणि संवेदनशील नायकाच्या हळुवार भूमिकेसाठी ते नेहमी ओळखले गेले. संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणार्‍या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या. प्रत्येक भूमिकेवर त्यांचा स्वत:चा असा वेगळा ठसा असायचा.
- पृथ्वीराज चव्हाण (मुख्यमंत्री)
रसिकांचे अलोट आणि चिरंतन प्रेम लाभलेल्या राजेश खन्ना यांच्या निधनाने अभिनयाच्या क्षेत्रातील एका महापर्वाचा अस्त झाला आहे. खन्ना यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना घातलेली मोहिनी आजही कायम आहे. ते खर्‍या अर्थाने ‘आनंद’ यात्री होते.
- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका सुपरस्टारमय ‘स्टाइल’युगाचा अंत झाला आहे. अभिनयाची अनोखी शैली आणि विशिष्ट ‘राजेश खन्ना स्टाइल’ अदाकारीने त्यांनी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रोमँटिमझमचे युग आणणारा पहिला सुपरस्टार म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.
- छगन भुजबळ (सार्वजनिक बांधकाम मंत्री)
साधा चेहरा आणि शैलीदार अभिनयाने राजेश खन्ना यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकप्रियता मिळवली होती. ‘आनंद’ हा चित्रपट पुढील अनेक पिढय़ांना प्रेरणा देत राहील.
- विनोद तावडे (विरोधी पक्षनेते, विधान परिषद)
हिंदी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीच्या काळात आनंद, आराधना, अमरप्रेम, दाग अशा अनेक चित्रपटांतून राजेश खन्ना यांनी भारतीय प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले.
- रामदास आठवले (अध्यक्ष, आरपीआय)

राजेश खन्नांच्या अभिनेत्री

इंद्राणी मुखर्जी, बबिता, आशा पारेख, नज्मा, शर्मिला टॅगोर, नंदा, मुमताज, वहिदा रेहमान, हेमा मालिनी, माला सिन्हा, तनुजा, साधना, जया बच्चन, नूतन, राखी, रेखा, मौसमी चॅटर्जी, झीनत अमान, नीतू सिंह, सुलक्षणा पंडित, शबाना आजमी, परवीन बाबी, डिंपल कापड.िया, जहिरा, सारिका, योगिता बाली, किम, पूनम ढिल्लों, रीना रॉय, टीना मुनीम, जयाप्रदा, रती अग्निहोत्री, पद्मिनी कोल्हापुरे, श्रीदेवी, सलमा आगा, स्मिता पाटील, मीनाक्षी शेषाद्री, शबाना सिद्दकी, मंदाकिनी, मुनमुन सेन, लीना चंदावरकर, नीलम, माधवी, अमृता सिंह, फरहा, दीपिका, नंदिता, लैला खान

१९९१ हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये २५ वर्षांची कारकीर्द
पूर्ण केल्यानिमित्त जीवनगौरव पुरस्कार
१९७१
फिल्म फेअर अँवॉर्ड
सच्चा झूठा (बेस्ट अँक्टर)
१९७२
फिल्म फेअर अँवॉर्ड -
आनंद (बेस्ट अँक्टर)
१९७३
फिल्म फेअर अँवॉर्ड - अनुराग (स्पे. गेस्ट अँक्टर)
१९७४
फिल्म फेअर अँवॉर्ड - अविष्कार (बेस्ट अँक्टर)
१९९५
कलारत्न अँवॉर्ड
२00५
फिल्म फेअर जीवनगौरव पुरस्कार

प्रसिद्धीचे सर्वोच्च शिखर!

- हरिणी कलामूर
त्यांचे हसणे, किंचित डोके वाकवणे आणि अनोख्या चालण्या-बोलण्यातूनही तमाम रसिकांच्या मनात हक्कचं घर कमावणारे, सार्वजनिक ठिकाणी ज्याच्याभोवती झालेली प्रचंड गर्दी सांभाळण्यासाठी आणि त्याच्यापासून महिलांना दूर करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागायची अशा प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेला चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना!
राजेश खन्ना म्हणजे फिल्मफेअर आणि युनायटेड प्रोड्युसर्सचे १९६५ मधील प्रचंड टॅलेन्ट. त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट ‘आराधना’. याच चित्रपटामुळे चित्रपटसृष्टीला शर्मिला टागोर आणि त्यांची लोकप्रिय जोडी मिळाली. या चित्रपटातील दोन गाण्यांच्या (‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई हमसे ना हो जाए’ आणि ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू’) मदतीने राजेश खन्ना हे सुपर रोमँटीक हीरो झाले. २९ डिसेंबर रोजी जन्मलेल्या काकांनी एकूण १६३ चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील १0६ चित्रपटांमध्ये ते मुख्य नायकाच्या तर २२ चित्रपटांत त्यांनी सहकलाकाराची भूमिका वठवली. एवढेच नव्हे तर राजेश खन्ना यांनी १७ लघुपटातही काम केले आहे.
फिल्मफेअरचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार राजेश खन्ना यांनी तीनवेळा पटकावला. १४ वेळा त्यांना या पुरस्काराचे मानांकन मिळाले. ‘आखरी खत’ने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या काकांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘राज’, ‘बहारों के सपने’, ‘इत्तेफाक’, ‘आराधना’ अशा कित्येक चित्रपटांमधून उत्कृष्ट अभिनयाची मालिका विणली आहे. त्यामुळेच २00५ साली त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना चित्रपटसृष्टीतील नामांकित अशा ‘फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर या जोडीने कारकीर्द गाजविली. ‘अमर प्रेम’ या चित्रपटात काकांनी कलकत्ता येथील एका जमीनदाराची भूमिका केलेली आहे तर अभिनेत्री एका सौजन्यशील भूमिकेत. ‘चिंगारी कोई भडके’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ या गाण्यांमधून जे आयुष्यभर सुखाला वंचित राहिले त्यांचे दु;ख उजागर केले आहे. याचसारखी पटकथा आहे ‘सफर’ चित्रपटाची. ज्यात तडजोड, अश्रू आणि कधीही न संपणारे प्रेम ‘अमर’ झाले आहे. काकांनी अभिनेत्रींसोबत केलेल्या प्रेमळ भूमिका आत्मीयतेने साकारल्या आणि त्या अजरामर झाल्या. त्यांच्या अभिनयातील हळवेपणाने रसिकांनी हृदयात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या फॅन्स क्लबमध्ये विशेषकरून महिलांचा समावेश अधिक होता. विशेष म्हणजे त्या काकांच्या अभिनयातून समृद्ध झालेले दु:खही गोंजारत असायच्या.

शिर्डीकर होण्याचे स्वप्न अधुरे..
प्रमोद आहेर। दि. १८ (शिर्डी)
सिनेरसिकांच्या हृदयावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे राजेश खन्ना निस्सीम साईभक्त होते. ते अनेकदा शिर्डीला येऊन गेले, पण साईसमाधीसमोर बसून अभिषेक करण्याची तसेच साईनगरीत वास्तव्य करण्याची त्यांची इच्छा अखेर अपूर्णच राहिली.
सुपरस्टार राजेश खन्नांच्या निधनाची दु:खद वार्ता कळताच शिर्डीकरांनी हळहळ व्यक्त केली. साईभक्त असलेले राजेश खन्ना गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने शिर्डीची वारी करत. सुपरस्टारपदाचे कोणतेही स्टारडम न बाळगता ते अगदी एखाद्या सर्वसामान्य भक्तांप्रमाणे साईमंदिरात वावरत. पहाटेच्या काकड आरतीला जाग यावी म्हणून ते रात्रभर जागेच असत!
शिर्डीत जमीन खरेदी..
साईनगरीत आपल्या हक्काचा निवारा असावा म्हणून मित्रांच्या माध्यमातून त्यांनी चार-पाच वर्षापूर्वी शिर्डीलगत साईमंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील निमगाव शिवारात दहा एकर जमीन खरेदी केली होती. या जागेवर अत्याधुनिक असे रिसॉर्ट आणि वॉटरपार्क बांधण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी विदेशी आर्किटेक्टकडून तसा प्लॅनही तयार करून घेतला होता; परंतु सततच्या आजारपणामुळे त्यांना आपली ही योजना पूर्णत्वास नेता आली नाही. गतवर्षी त्यांनी ती जमीनही विकून टाकली, अशी माहिती त्यांचे मित्र फकिरा लोढा यांनी सांगितले.

आणखी >>

मुलगी वाचवा, २५ हजार मिळवा

नाशिक महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत स्त्री भ्रूण हत्त्येसंदर्भात माहिती कळविणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिस जाहीर केले आहे.

आणखी >>

पुणे विद्यापीठात आता नवे अभ्यासक्रम

पुणे। दि. ९ (प्रतिनिधी)
पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून विविध महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या नवीन अभ्यासक्रमांना राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून ६३ हून अधिक शिक्षण संस्थांमध्ये १५0 हून अधिक नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत.
राज्य शासनाच्या माध्यमातून दर वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना नव्या अभ्यासक्रमांना मान्यता दिली जात असते. त्यानुसार यंदाही राज्यातील विद्यापीठांच्या माध्यमातून संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांनी त्यानुसार प्रस्ताव पाठवले होते. त्यातील पारंपरिक अभ्यासक्रमांचे काही प्रस्ताव वगळता बहुतांश नव्या अभ्यासक्रमांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठांतर्गत येणार्‍या पुणे, नगर व नाशिक येथील संस्थांनी त्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यामध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी यांसह पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातील फग्यरुसन महाविद्यालयातर्फे अँनिमेशनसह यंदा पहिल्यांदा एम. एस्सी. झूलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. सूर्यदत्ता संस्थेच्या वतीने मॅनेजमेंट अकाउंटिंग, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, इन्कम टॅक्स, फायनान्शिअल अँनालिसिस अँड कंट्रोल, रीसर्च मेथडॉलॉजी अँड बिझनेस आदी पदव्युत्तर अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. एमएमसीसी महाविद्यालयाला एमसीएस अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
मॉडर्न महाविद्यालयामध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये सायंटिफिक कोर्स, तसेच ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये पीजी डिप्लोमा, नेटवर्क अँडमिनिस्ट्रेशन अणि व्हीएलएसआय डिझायनिंगमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. एच. व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये अँनालिटिकल केमिस्ट्री, भौतिकशास्त्र, एमसीए विज्ञान आणि बीएस्सी अँनिमेशन हे अभ्यासक्रम सुरू होत आहेत.
त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील, ग्रामीण भागांतील तसेच अहमदनगर व नाशिक या शहरांतीलही अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आधुनिकतेचा वेध घेणारे अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. या सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाच्या वतीने व राज्य शासनामार्फत मान्यतेचे पत्र प्राप्त झाले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची सुरुवात केली जाणार आहे.

आणखी >>

कर्डेलवाडीची शाळा जागतिक स्तरावर

शिरूर। दि. ९ (वार्ताहर)
गुणवत्ता तसेच पटनोंदणीसंदर्भात राज्यातील शाळांना फटकारे बसत असतानाच राज्यासाठी आदर्श ठरावी, अशा कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताच्या ‘इंडियन पस्र्पेक्टिव्हज’ या १३२ देशांच्या दूतावासात जाणार्‍या आंतरराष्ट्रीय मासिकात या शाळेची महती प्रसिद्ध होणार आहे.
३६५ दिवस सुरू असणारी कर्डेलवाडी (ता. शिरूर) जिल्हा परिषद शाळा ही देशातील एकमेव शाळा असावी. या शाळेला दोन वर्षांत किमान ४0 हजार लोकांनी भेट दिली आहे. तीन वर्षांपूर्वी पाच जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या शाळेस भेट देण्यास आले होते. भेट देऊन परतताना या शाळेचा ‘पॅटर्न’ राज्यभर राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. गेल्या दहा वर्षांत एकही रजा, एकही सुट्टी न घेता विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे झटणारे या शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व उपशिक्षिका बेबीनंदा सकट यांच्यासारख्या शिक्षकांमुळेच या शाळेने हे यश मिळवले आहे.
दोन वर्षांपूर्वी ही शाळा ब्रिटिश कौन्सिलशी जोडली गेली आहे. तेथील शाळेतील शिक्षकांनी गेल्या वर्षी शाळेला भेटही दिली होती. आता सकट दांपत्य ब्रिटनला जाणार आहे. नुकतेच अमेरिकन शिष्टमंडळही शाळेस भेट देऊन गेले.
‘इंडियन परस्पेक्टिव्हज’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या पत्रकार गौरी आठल्ये यांनी आज शाळेत येऊन शाळेची माहिती घेतली. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, स्वत:चा अभ्यास करण्याची पद्धत, शाळेतील सुविधा, स्वच्छता, विविध विषयांतील विशेष गुणवत्ता, संगणक हाताळणी याची माहिती प्रत्यक्षात अनुभवतानाच आठल्ये यांनी ग्रामस्थांशीही संवाद साधला. शाळेची माहिती १५ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार्‍या अंकात प्रसिद्ध होणार आहे. जगातील १३२ दूतावासांत हे मासिक जाते. यामुळे १३२ देशांत या शाळेचे नाव झळकणार आहे. ‘इंडियन परस्पेक्टिव्हज डॉट कॉम’या संकेतस्थळावरही ही माहिती उपलब्ध होणार आहे.

‘‘विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांचे उज्‍जवल भवितव्य हेच माझे व माझ्या पत्नीचे (सहशिक्षिका) ध्येय आहे. या ध्येयातून आम्ही गेली दहा वर्षे रोज काम करीत आहोत. यातूनच शाळा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकली आहे.
- दत्तात्रय सकट,
मुख्याध्यापक

आणखी >>

वीरभूमी! वढू-तुळापूर !

अभिजित बेल्हेकर ,बुधवार, २१ मार्च २०१२
abhijit.belhekar@expressindia.com

आणखी >>
  • 1