शिरुर-केडगाव चौफुला रस्त्यावर रोखल्या एसटी बसेस

करडे, ता. 12 ऑगस्ट 2015 (तेजस फडके)- शिरुर आगाराच्या एसटी बस येथे सकाळी थांबत नसल्याने संतप्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिरुर-केडगाव चौफुला रस्त्यावर शिरुर आगाराच्या ४ ते ५ एसटी बस सुमारे अर्धा तास रोखून धरल्या. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या शिरुरच्या आगार व्यवस्थापनाने शिरुर आगाराचे वाहतुक निरीक्षक के. खांडेकर यांच्या मार्फत करडे येथे सकाळी स्वतंत्र बस पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले.

करडे हे शिरुर-केडगाव चौफुला रस्त्यावरील महत्वाचे गाव आहे. येथील अनेक विद्यार्थी शिरुर येथे शिक्षणासाठी जातात. शिरुर येथून केडगाव चौफुला मार्गे अनेक एसटी बसेस जातात. सकाळच्या वेळेस महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अनेक विद्यार्थ्याकडे एसटीचे पास आहेत. परंतु, सकाळी शिरुरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसमध्ये गर्दी असल्याने त्या गाड्या करडे येथे थांबत नाहीत. यामुळे विद्यार्थ्याना खाजगी वाहनाने असुरक्षित प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे.

सकाळी करडे येथे एसटी बस थांबविण्यात यावी यासाठी येथील माजी सरपंच राजेंद्र जगदाळे (पाटील) व सामाजिक कार्यकर्ते युवराज राजेनिंबाळकर यांनी गेले दोन वर्षे शिरुर एसटी आगराच्या वरीष्ठ अधिकार्यांना वारंवार लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. परंतु, परीस्थिती 'जैसे थे'च होती. मंगळवारी (ता. 11) संतप्त विद्यार्थ्यानी ४ ते ५ एसटी बस सुमारे अर्धा तास रोखून धरत आपला संताप व्यक्त केला. याला स्थानिक लोकप्रतिनिधीं सुद्धा पाठिंबा दिला.

यावेळी शिरुर पंचायत समितिच्या उपसभापति मंगल लंघे, सरपंच कविता जगदाळे, उपसरपंच गणेश रोडे, माजी सरपंच राजेंद्र जगदाळे, संतोष लंघे, युवराज राजेनिंबाळकर व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Widget is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या