काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

राम कदम यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?

मुंबई : घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. त्याचसोबत भाजप वगळता इतर सर्व पक्ष राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाले आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम कदम माफी मागणार नाहीत तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा इशाराच दिला आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या नियमांनुसार राम कदम यांच्यावर काय कारवाई होऊ शकते ते पाहूया.. 1) राम कदम यांच्या निलंबनाचा अशासकीय प्रस्ताव सभागृहात आणावा लागेल. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी मान्य केला तर तो सभागृहात बहुमताने सिद्ध करावा लागेल. 2) विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेचा साथ मिळाली तर राम कदम यांच्यावर कारवाई होऊ शकते. भाजप - 122 रासप - 1 बहुजन विकास आघाडी - 3 अपक्ष - 7 ------- एकूण = 133 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी काँग्रेस - 41 शेकाप - 3 एमआयएम - 2 मनसे - 1 सपा - 1 भारिप - 1 माकप - 1 ------- एकूण = 155 3) सरकारकडून उच्चस्तरीय समिती गठित करुन शिक्षेच्या पुढील शिफारशी करण्यात येतील. -  विशेषाधिकार भंग, - कारावासाची शिक्षा, - निलंबन करणे - सदस्यत्व कायमचे रद्द करणे चौकशी पूर्ण करुन अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

आणखी >>

समलिंगी संबंध गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Section 377 Verdict :नवी दिल्ली: समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला. प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे.  जुनी विचारधारा बदलण्याची गरज, प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. लोकांना आपली मानसिकता बदलायला हवी. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला. LGBT( lesbian, gay, bisexual, transgender) या संपूर्ण कम्युनिटीसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. कोर्टाने नेमकं काय म्हटलं? देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत. जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवं. देशात सर्वांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, असं कोर्टाने नमूद केलं. समाजाने पूर्वग्रहदूषित विचारधारेपासून मुक्त व्हायला हवं. प्रत्येकाने आकाशात इंद्रधनुष्य शोधायला हवा. विशेष म्हणजे इंद्रधनुष्य झेंडा हा एलजीबीटी समाजाचं प्रतीक आहे, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. समलिंगी संबंध गुन्हा नाही, पण कलम 377 ही कायम सुप्रीम कोर्टाने कलम 377 रद्द केलेलं नाही, तर त्यातून परस्पर सहमतीने समलिंगी संबंधाला गुन्हेगारी कक्षेतून वगळलं. कलम 377 अंतर्गत सहमतीने प्रौढांसोबत समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही.  मात्र सहमतीशिवाय समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा असेल. तसंच मुलं आणि जनावरांशी अनैसर्गिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.

आणखी >>

बेताल वक्तव्याप्रकरणी राम कदम यांचा माफीनामा

मुंबई : दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. तीन दिवसांनी राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राम कदम यांनी लिहिलं आहे की,

आणखी >>

जी मजा घेण्यात नाही ती देण्यात आहे, 'ए मेरे वतन...'वरुन आशाताईंचा टोला

मुंबई : काही गोष्टी घेण्यात नाही, तर देण्यात आनंद असतो, असं भाष्य करुन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी लतादीदींना टोला लगावला आहे. 'ए मेरे वतन के लोगो, या गाजलेल्या गाणं नेमकं कुणाचं, आपलं की लतादीदींचं असा प्रश्न विचारल्यावर आशाताईंनी हे उत्तर दिलं. पद्मविभूषण आशा भोसले यांचा येत्या 8 सप्टेंबरला 85 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात काल (5 सप्टेंबर) 'आपल्या आशाताई' हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आशाताईंची प्रकट मुलाखत घेतली. स्वभावाप्रमाणे आशाताईंनी त्यांच्या खास शैलीमध्ये प्रश्नांची उत्तरं दिली. आपल्या आयुष्यातील अनेक चढउतार त्यांनी बोलून दाखवले. राजकारण्यांबाबत विचारलं असता, मला माझ्या घरातलेच राजकारण सांभाळता आलं नाही, असं त्या म्हणाल्या. 'ए मेरे वतन के लोगों' या गाण्याच्या वादाबद्दल विचारले असता, काही गोष्टी घेण्यात नाही तर देण्यात आनंद असतो, असं म्हणत त्यांनी लतादीदींना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. यावेळी आशाताईंनी सुधीर फडके, लता मंगेशकर यांची नक्कलही करुन दाखवली. तसंच 'जिवलगा', 'दिल चीझ क्या है', 'पूछो न यार क्या हुआ' ही गाणीही गायली.

आणखी >>

तुमच्या आहारातील मिठात प्लॅस्टिकचे कण, शास्त्रज्ञांचा संशोधनात दावा

मुंबई : तुम्ही रोजच्या आहात मीठ खाता की प्लॅस्टिक? हे विचारण्याचं कारण म्हणजे तुमच्या मिठात प्लॅस्टिक असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. हा नुसता दावाच नाही, तर त्यावर संशोधनही करण्यात आलं आहे. क्या आपके प्लॅस्टिक मे नमक है? ही जाहिरात वाटत असली तरी एक धक्कादायक वास्तव आहे. कारण तुमच्या जेवणात, ताटात पडणाऱ्या मिठामध्ये चक्क प्लॅस्टिकचे कण असल्याचं समोर आलं आहे. इतकंच काय, वर्षाला तुमच्या पोटामध्ये 0.117 मिलीग्रॅम प्लॅस्टिक जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी मुंबईतल्या सेंटर फॉर एन्व्हायरमेन्टल सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातल्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं असून त्यात 8 विविध कंपन्यांच्या मिठांच्या नमुन्यात एक किलो मिठामध्ये प्लॅस्टिकचे तब्बल 626 कण आढळले आहेत. जून आणि सप्टेंबर 2017 मध्ये 8 वेगवेगळ्या कंपन्यांचं मीठ एकत्र करण्यात आलं. या मिठाचं उत्पादन 2016 आणि 2017 या वर्षात झालं आहे. प्रयोगशाळेत 80 टक्के नमुन्यांमध्ये मिठाचे सूक्ष्म कण आढळले. त्यातल्या प्लॅस्टिकच्या कणांचा आकार हा 0.5 मिलीमीटर होता, तर तंतूचा आकार 2 मिलीमीटर इतका जाड होता. काही तंतू तर 5 मिलीमीटर इतके जाड होते मीठ हे समुद्राच्या खाऱ्या पाण्याद्वारे तयार केलं जातं. त्यामुळे समुद्रात टाकलेल्या प्लॅस्टिकचे अंश या पाण्याद्वारे थेट तुमच्या मिठात येत आहेत. म्हणजेच मीठ कयार करताना किंवा कारखान्यामध्ये यात प्लॅस्टिक मिसळलेलं नाही. फक्त भारतातच नाही, तर चीन, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, तुर्की, फ्रान्स या देशांनाही मिठातल्या प्लॅस्टिकचा सामना करावा लागत आहे. तुम्ही जे समुद्राला अर्पण करता... तेच समुद्र तुम्हाला साभार परत करतो... त्यामुळे मंडळी... खाल्ल्या मिठाला जागा... पर्यावरणाचा आदर करा...  अन्यथा अख्खं आयुष्यच प्लॅस्टिकचं होऊ जाईल.

आणखी >>

महाराष्ट्रातील नव्या बंधकामांवरील बंदी तूर्तास उठवली!

मुंबई : महाराष्ट्रातील नव्या बांधकामांवरील बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी हा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं

आणखी >>

ओव्हल कसोटीसाठी कोहलीचा भरवशाचा फलंदाज कोण?

मुंबई : भारत आणि इंग्लंड संघांमधली ओव्हलची पाचवी कसोटी आता तोंडावर आली आहे. पण टीम इंडियानं चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही गमावून आपली अब्रू गमावली. आता इंग्लंड दौऱ्यातली उरलीसुरली लाज राखायची, तर भारताला पाचवी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला आणखी एका भरवशाच्या फलंदाजाची साथ हवी आहे. विराट कोहलीनं 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यातलं अपयश 2018 साली धुवून काढलं. टीम इंडियाच्या कर्णधारानं चार कसोटी सामन्यांमधल्या आठ डावांमध्ये 544 धावांचा डोंगर उभारला. पण दुर्दैव विराटच्या या सातत्याला दुसऱ्या टोकाकडून साथच लाभली नाही. आणि इंग्लंडनं साऊदम्प्टन कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांची मालिका आपल्या खिशात घातली. विराट कोहली हा आजच्या जमान्यातला सर्वोत्तम फलंदाज आहे, यात कुणाच्याही मनात शंका नाही. पण क्रिकेटसारख्या सांघिक खेळात एकटा सचिन तेंडुलकर किंवा एकटा विराट कोहली तुम्हाला कधीच जिंकून देऊन शकत नाही. इंग्लंड दौऱ्यातल्या पहिल्या चार कसोटी सामन्यांत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनंही धावा केल्या आहेत. पण जिंकायचं म्हटलं की, टीम इंडिया म्हणजे वन मॅन शो हे समीकरण ठरलेलं आहे. त्यात सलामीच्या मुरली विजय आणि लोकेश राहुल यांची तर धावांच्या नावानं बोंबच झाली. कसोटी क्रिकेटमध्ये शिखर धवन भारतीय संघाचं ओझं एकट्याच्या खांद्यावरून वाहून नेऊ शकत नाही, यावरही पुन्हा शिक्कामोर्तब झालं. या परिस्थितीत टीम इंडियासमोर सलामीचा उदयोन्मुख फलंदाज पृथ्वी शॉकडे वळण्याशिवाय खरोखरच पर्याय दिसत नाही. पृथ्वीनं गेल्या दीड वर्षात 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीनं 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 19 सामन्यांत 651 धावा जमा आहेत. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी आहे 34.36. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर नाईन्टीन विश्वचषकावरही यंदा आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पृथ्वी थोरामोठ्यांच्या अगदी खांद्याला खांदा भिडवून खेळला. पृथ्वीची ताजी कामगिरी लक्षात घेता, लोकेश राहुलऐवजी त्याला पाचव्या कसोटीसाठी संधी मिळण्याची चिन्हं आहेत. पण पृथ्वीचं वय जेमतेम 18-19 वर्षांचं वय लक्षात घेता, त्याला आपली गुणवत्ता दाखवून देण्यासाठी पुरेशी संधी मिळण्याची आवश्यकता आहे. पृथ्वी शॉसारखा फलंदाज हे भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. आणि ते भविष्य जपण्याची जबाबदारी ही बीसीसीआयची आहे.

आणखी >>

मोबाईलवर बोलत रॅश ड्रायव्हिंग, वाहनचालकावर रणवीर चिडला

मुंबई : बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकाला अभिनेता रणवीर सिंहने दटावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणारा संबंधित कारचालक रणवीरच्या कारला धडकणार होता, त्यामुळे रणवीरचा पारा चढला. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या वाहनचालकाला अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने ओरडल्याची घटना ताजी असतानाच रणवीरबाबतही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित वाहनचालकाने ट्विटरवर रणवीर डाफरत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये रणवीर नीट दिसत नसला, तरी रणवीरने आपल्याला शिवीगाळ केल्याचा दावा वाहनचालकाने केला आहे. 'तुमच्यासारख्या माणसांना वागण्या-बोलण्याचं तारतम्य असायला हवं. कोणाच्या आई-बहिणीसमोर शिव्या देऊ नयेत, हेसुद्धा समजत नाही का. असाच अॅटिट्यूड राहिला तर लवकरच रस्त्यावर येशील. आधी लोकांशी कसं बोलावं हे शिकून घे मग हिरो हो फ्लॉप अभिनेत्या' असं ट्वीट त्याने केला आहे. व्हिडिओमध्ये केवळ वाहनचालक सॉरी बोलत असल्याचं ऐकू येतं. ट्विटराईट्सनी मात्र रणवीर सिंगची बाजू घेत वाहनचालकालाच फैलावर घेतलं आहे. रणवीर ओरडत असल्याचा व्हिडिओ शूट करण्यापेक्षा चूकांमधून काहीतरी शिक, असं काही जणांनी त्याला सांगितलं. तर कोणी वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा सल्लाही त्याला दिला.    

आणखी >>

लग्न ठरलं, अफगाणिस्तानातून वरात यूपीत आली, अन् लग्न मोडलं!

लखनौ : तो अफगाणिस्तानचा, तर ती उत्तर प्रदेशची. फेसबुकवरुन ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. घरच्यांच्या संमतीने दोघांचं लग्नही ठरलं. नवरदेव अफगाणिस्तानातून वरात घेऊन आला आणि... इथेच माशी शिंकली. 'काहे दिया परदेस' असा प्रश्न विचारत मुलीच्या नातेवाईकांनी ऐनवेळी लग्न मोडलं. त्यामुळे हिरमोड झालेला बिचारा नवरदेव रिकाम्या हाती मायदेशी परतला. उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात खलिलाबादमध्ये राहणाऱ्या तरुणीची ओळख वर्षभरापूर्वी 29 वर्षांच्या फरीदुल रफ्ताई या अफगाणी तरुणाशी झाली. फेसबुकवर दोघांचं चॅटिंग सुरु झालं. ओळखीचं रुपांतर मैत्रीत... मैत्रीचं यथावकाश प्रेमात झालं! दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनीही मान्य केला. शनिवारी फरीदुलसोबत त्याचे 60 वर्षीय वडील मोहम्मद कादीर, आई आदिला रफ्ताई, बहीण नादिया आणि 70 वर्षीय काका कासिम वापसी लग्नासाठी भारतात आले. दोघांचा निकाह होणार, इतक्यात मुलीच्या नातेवाईकांनी विरोध करायला सुरुवात केली. मुलीला लग्न करुन परदेशात पाठवण्यास नातेवाईकांचा जोरदार विरोध होता. अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. लग्न मोडल्यामुळे हिरमुसलेला नवरदेव फरीदुल वऱ्हाडासोबत मायदेशी परतला. मला माझ्या मुलीला वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर करायचं आहे. परदेशात तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं मत निकाह मोडल्यानंतर तिच्या वडिलांनी व्यक्त केलं.

आणखी >>

सलमानशी लग्न करण्यासाठी तरुणी उत्तराखंडहून पळून मुंबईत

मुंबई : सुपरस्टार सलमान खानला भेटण्यासाठी देशभरातून चाहते 'गॅलक्सी' या त्याच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करतात. सलमानशी लग्न करण्यासाठी उत्तराखंडमधील 24 वर्षीय मनोरुग्ण तरुणी घरातून पळाली आणि तिने मुंबई गाठली. देहरादूनमध्ये राहणाऱ्या कुसुम नावाच्या तरुणीने 11 ऑगस्टला घर सोडलं. मजल दरमजल करत ती उत्तराखंडहून मुंबईला आली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या सलमानच्या घराबाहेर म्हणजेच गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर येऊन ती धडकली. सलमानच्या सुरक्षारक्षकांनी कुसुमला अडवलं. त्यानंतर तिच्याविषयी शिवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत सलमानशी लग्न करण्यासाठी आपण घरातून पळून आल्याचं तिने सांगितलं. पोलिसांनी कुसुमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. आपली मुलगी मानसिकदृष्ट्या अस्थिर असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. यापूर्वीही अनेक वेळा ती घर सोडून गेल्याचं वडिलांनी सांगितलं.

आणखी >>

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज (5 सप्टेंबर) निधन झालं. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं समजतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह देखील होता. अखेर आज त्यांची प्राणज्येत मालवली. झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. शुभांगी जोशी यांनी 'काहे दिया परदेस' मालिकेतील गौरीच्या आजीची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेमधील त्यांचे मालवणी भाषेतील संवाद, गौरीचे बाबा अर्थात मोहन जोशींच्या भूमिकेशी छोटे-मोठे वाद प्रेक्षकांना आवडत होते. 'आभाळमाया'सारख्या मालिकेपासून अगदी आताच्या 'कुंकू, टिकली आणि टॅटू' या मालिकेतही शुभांगी जोशी काम करत होत्या.

आणखी >>

आमदार राम कदम रावणाच्या रुपात, मनसेचे पोस्टर

मुंबई : मुली पळवण्याच्या वादग्रस्त विधानाबाबत भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टर लावले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आणि घाटकोपर इथे पोस्टर लावून निषेध व्यक्त केला आहे. राम कदम यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. तसंच राम कदम यांच्या भव्य रक्षाबंधन सोहळ्याची खिल्ली उडवत त्यांचं व्यंगचित्र काढण्यात आल आहे. मनसेचे घाटकोपरमधील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी हे बॅनर लावले आहेत. यात आता मनसेने मुख्यमंत्री आणि भाजप सरकारवरही निशाणा साधला आहे. घाटकोपरमधील बॅनर पोलिसांनी उतरवले असून एकाला ताब्यात घेतलं आहे. परंतु आज दिवसभर आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची आंदोलनं होणार आहेत. त्यामुळे आमदार राम कदम यांना दहीहंडी कार्यक्रमात केलेलं विधान महागात पडलं आहे. वर्षा बंगल्याबाहेरील पोस्टर

आणखी >>

..तर मुलीला पळवून आणण्यास मदत करेन: आमदार राम कदम

मुंबई: तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. घाटकोपरमध्ये काल दहीहंडी उत्सवात राम कदम बोलत होते.

आणखी >>

बेताल वक्तव्याबाबत राम कदमांकडून खेद व्यक्त, मात्र माफी नाहीच!

मुंबई : मुली पळवण्याच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन खेद व्यक्त केला आहे. मात्र, आपल्या बेताल वक्तव्याबाबत राम कदमांनी अद्यापही माफी मागितली नाही. राम कदमांकडून खेद व्यक्त “कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेंकंदांचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते.”, असे राम कदम यांनी ट्वीट केले आहे.

आणखी >>

पुस्तकी शिक्षणापलिकडचे प्रयोग, नगरमधील शिक्षकाचा स्तुत्य उपक्रम

अकोले (अहमदनगर) : वीरगाव जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेला पुस्तकी शिक्षणाला रोजच्या जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न करणारा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुलांना ‘शिकते’ करण्याचा ध्यास घेतलेल्या जिल्हा परिषद शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मुलांचं अनुभवविश्व जाणून घेण्याचा आणि त्यावरुन त्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा अनोखा प्रयत्न भाऊसाहेब चासकर यांनी केला आहे. काय आहे उपक्रम? पाठ्यपुस्तकात असणाऱ्या स्वप्नवत गोष्टींच्या पलिकडे जात, विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित गोष्टींवर चर्चा करुन, त्यांचा अनुभवविश्व समजून घेऊन, शिकवण्यावर भर देण्याचा प्रयत्न भाऊसाहेब चासकर यांनी केला. विद्यार्थ्यांना ‘आई’, ‘बाप’ कसे दिसतात, कसे वाटतात, त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतं, काय विचार करतात इत्यादी अनेक गोष्टी चासकर यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांकडून व्यक्त समजून घेतल्या. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी सहभागी झालेल्या या उपक्रमातून काही रंजक, काही दु:खद, काही संवेदनशील, तर काही गंभीरपणे विचार करावयास भाग पाडणाऱ्या गोष्टी समोर आल्या. “महायुद्ध, फ्रेंच, रशियन, औद्योगिक क्रांत्यांविषयी बोलताना स्वतःच्या कुटुंबाच्या इतिहासाकडे बघायला मुलांना शिकवायला हवे. अनेक मुलांना आजोबा, पंजोबाचे नावच माहिती नसते. इजिप्तची नाईल नदी सर्वाधिक लांबीची आहे, हा जगाचा भूगोल शिकवताना आपल्या गावाजवळून वाहणाऱ्या नदीविषयी मुलांसोबत बोलायला हवे. आपला गाव, भाषा, परिसर शिक्षणात यायला हवा.”, असे प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या याच म्हणण्याला ‘आई’ आणि ‘बाप’ या शब्दांमधून विद्यार्थ्यांची समज जाणून घेण्याचा उपक्रम दुजोरा देतो. उपक्रम एक : ‘आई ‘आई शेतात फाटकी साडी घालते आणि लग्नाला किंवा गावाला जाताना नवीन साडी घालते’, सांगत विद्यार्थ्याने आईबाबतची त्याची समजच केवळ वर्णन केली नाही, तर जगण्यातील वास्तवही अप्रत्यक्षरित्या समोर आणलं आहे. जे त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना, शिक्षकांनी शिकवण्याची पद्धत कशी ठेवली पाहिजे, हेही सांगणारं आहे. याचसोबत, ‘आई जीव लावते’, ‘घरकाम करते’, ‘आवरुन देते’, ‘शेतात काम करते’, ‘स्कूटर चालवते’ इथपासून ते 'आई मारते', 'आई रागवते' इथवर, आईची विविध रुपं इयत्ता दुसरीतल्या निरागस चिमुकल्यांनी सांगितली आहेत.

आणखी >>

नवी मुंबईत भरकोर्टात न्यायाधीशांना धामण चावली

नवी मुंबई : पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश सी. पी. काशीद यांच्या हाताला सापाने चावा घेतला. भरकोर्टात सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायाधीशांना धामण चावली. नेहमीप्रमाणे सकाळी न्यायाधीश काशीद कोर्टात आले. काही वेळातच त्यांच्या हाताला धामण चावली. त्यानंतर न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली. सर्पमित्र दीपक ठाकूर यांना तातडीने बोलावण्यात आलं आणि त्यांनी धामण पकडली. साप बिनविषारी असल्याचं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. न्यायाधीशांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पनवेल न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत असून त्याची निगा राखली जात नाही. त्यामुळे कोर्टात बरेच वेळा साप येत असल्याची माहिती आहे

आणखी >>

दुधाला पाच रुपये अनुदानाची घोषणा कागदोपत्रीच!

मुंबई : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने जुलै महिन्यात केली. या घोषणेनंतर आज सप्टेंबर महिना उजाडला तरी ही घोषणा कागदोपत्रीच राहिली आहे. 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट हे बिल दूध संघाने स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांना दिलं, पण सरकारने अजूनही पण दूध संघाना सरकारने अनुदान परतावा दिलेला नाही. त्यामुळे दूध संघांनी आता पुढचे अनुदान द्यायला हात वर केले आहेत. राज्यातील बळीराजाच्या शेतमालाला भाव मिळत नाही, त्यात दुधाचे भाव कोसळले. त्यामुळे दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन सुरु केलं. शहरकडचा दूध पुरवठा रोखला गेला, टँकरच्या टँकर दूध रस्त्यावर ओतलं गेलं. यानंतर झोपलेल्या सरकारला जाग आली आणि सरकारने दूध संघाबरोबर बैठका घेतल्या. या बैठकीत पावडर बनवणाऱ्या दूध संस्थांना पाच रुपये अधिकचे अनुदान देण्याची घोषणा सरकरने केली. या घोषणेनुसार 1 ऑगस्टपासून दूध संघांनी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान द्यायला सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात पहिलं मस्टर म्हणणे 1 ते 10 ऑगस्टसाठी दूध संघांनी दुधावर 5 रुपये अनुदान दिले. पण त्याचा परतावा अजूनही सरकारने दूध संघांना दिला नाही. ज्याप्रमाणे कर्जमाफी देताना राज्य सरकारच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे कर्जमाफी रखडली आणि शेतकऱ्यांना मनस्ताप झाला. तोच मनस्ताप आज दुधाच्या अनुदानप्रश्नी दूध संघ आणि शेतकऱ्यांना होत आहे. राज्य सरकारने घोषणा करुनही अजून दूध संघाना पाच रुपये अनुदान दिले नाही, त्यामुळे दूध संघ अडचणीत येतील. याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेने दिला आहे. दूध अनुदान प्रकरणी राज्य सरकार बैठक घेत आहे. विभागातून सांगण्यात येतंय की अनुदानाबाबत कारवाई होईल. पण अजूनही घोषणा कागदावर असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे सरकारचं हे अपयश आहे की दूध उत्पादक शेतकरी आणि सहकारी दूध संघ हे राजकारणाचे बळी ठरत आहेत, असा प्रश्न समोर येतो आहे. दूध आयुक्तांनी दिलेल्या महितीनुसार, 42 संस्थांना सरकारकडून अनुदान देय आहे. राज्य सरकारला अनुदान देण्यासाठी त्यांनी या दूध संस्थांकडून माहिती मागितली आहे. आतापर्यंत 7 दूध संस्थांनी माहिती दिली. त्यांचे पहिल्या मस्टरचे म्हणजे 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंतच्या दुधाचा 7 कोटी 62 लाख अनुदान परतावा देणं अपेक्षित आहे. पण ते अनुदान अजून देण्यात आलं नाही. त्यामुळे अजून अशा 35 दूध संस्था आहेत, ज्यांना एकही मस्टर अनुदान परतावा मिळाला नाही.  

आणखी >>

काँग्रेसची नक्षलवाद्यांना सहानुभूती, भाजपचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक केलेल्यांच्या तपासात आणखी एक पत्र हाती लागल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. या पत्रात नक्षलवाद्यांनी काँग्रेसमधील आपले मित्र मदतीसाठी तयार असल्याचा दावा केल्याचं पात्रांचं म्हणणं आहे. धक्कादायक म्हणजे, काँग्रेसच्या मित्राचा म्हणून जो क्रमांक देण्यात आलाय, तो क्रमांक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा असल्याचा आरोपही संबित पात्रा यांनी केला आहे. तसेच, काँग्रेस सत्तेत असताना गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या काहींची नक्षलवाद्यांना सहानुभूती असल्याचा दावाही संबित पात्रा यांनी केला आहे. पात्रा यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यावरही गंभीर आरोप केलाय. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या महेश राऊतला यूपीए सरकारच्या काळातही अटक झाली होती. मात्र, त्यावेळी जयराम रमेश यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून राऊत सज्जन व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं, असा आरोप पात्रा यांनी केलाय. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रांनी नेमके काय दावे केलेत? “काँग्रेस पक्षात असे काहीजण आहेत, ज्यांची नक्षलवादाला सहानुभूती आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, काँग्रेसची राष्ट्रीय सल्लागार समिती नक्षलवादाचं समर्थन करते.”, असा दावा संबित पात्रा यांनी केला आहे. तसेच, “काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणांनी टाकलेल्या छाप्यात कॉम्रेड सुरेंद्र आणि कॉम्रेड प्रकाश यांचं 25 सप्टेंबर 2017 रोजीचं पत्र सापडलं. ‘या प्रक्रियेत काँग्रेस नेते आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. आंदोलनांसाठी निधी देण्यासाठीही ते तयार आहेत.’ असे त्या पत्रात म्हटलं आहे.” असा दावाही संबित पात्रांनी केला आहे. या पत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा नंबरही आढळला असल्याचा दावाही पात्रांनी केला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचं स्पष्टीकरण “आधी देशद्रोही आणि आता नक्षलीचा आरोप. मात्र या नंबरशी माझा काहीही संबंध नाही. माझा नंबर अनेकांजवळ आहे, बाकी सरकारचा निर्णय असेल, सरकारला वाटत असेल, तर त्यांनी मला अटक करावी.”, असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दिले आहे.

आणखी >>

विवाहबाह्य संबंधातून विवाहितेचे हल्लेखोर प्रियकरावर कुऱ्हाडीने वार

पिंपरी चिंचवड : विवाहित प्रेयसीने विवाहित प्रियकरावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. विवाहबाह्य संबंधातून झालेल्या वादावादीमुळे प्रियकर हा प्रेयसीवर हल्ला करण्यासाठी आला होता, मात्र प्रेयसीनेच त्याच्यावर वार केले. पिंपरी चिंचवडच्या विठ्ठलनगरमध्ये काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली. आरोपी प्रेयसी सविता जाधवला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवीण भाग्यवंतवर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सविता ही आईच्या घरी असताना प्रवीण तिला घेऊन जाण्यासाठी आला. मात्र, ती न आल्यामुळे तो कुऱ्हाड घेऊन परतला. दोघांमध्ये झटापट सुरु झाली, त्यात सविताने प्रवीणच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि तिने प्रवीणच्या गळ्यावर हल्ला केला. यामध्ये प्रवीणच्या श्वसननलिकेवर आघात झाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सविता आणि प्रवीण यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोघंही विवाहित असून त्यांना दोन-दोन अपत्यं आहेत. त्यानंतरही दोघांचे विवाहबाह्य संबंध सुरुच होते.

आणखी >>

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल

मुंबई: पेट्रोल-डिझेलचे दर काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. मुंबईत उच्चांक गाठलेल्या पेट्रोल दराने आजही आगेकूच कायम ठेवली आहे. मुंबईतील आजचा पेट्रोल दर 86.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. गेल्या चार दिवसात मुंबईतील पेट्रोल दरात 1 रुपये 62 पैसे इतकी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळतं. अमरावतीत एक लिटर पेट्रोलसाठी 87.97 रुपये मोजावेल लागत आहेत. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत सोलापूर  दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोलापुरात पेट्रोलचा आजचा दर  87.77 रुपये लिटर इतका आहे. मुंबईत रविवारी पेट्रोलसाठी लिटरमागे तब्बल 86.25 रुपये मोजावे लागले होते, काल सोमवारी पेट्रोलने त्यापुढे म्हणजेच 86.56 रुपयांपर्यंत मजल मारली. आजही ही आगेकूच कायम राहात पेट्रोल 86.72 रुपयांपर्यंत पोहोचलं. पेट्रोलचा हा मुंबईतील आजपर्यंतचा सर्वोच्च दर आहे. दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत आहे. कारण पेट्रोलने नवा उच्चांक गाठल्यानंतर डिझेलनेही आगेकूच कायम ठेवली.  मुंबईतील डिझेलचा प्रतिलिटर दर 75.74 रुपये इतका आहे. महाराष्ट्रात अमरावतीत सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीतील आजचा पेट्रोल दर हा 87.97 रुपये प्रति लिटर इतका आहे. काल हा दर 87.81 रुपये इतका होता. त्यामध्ये आज 16 पैशांनी वाढ झाली. अमरावतीनंतर सर्वाधिक पेट्रोल दर असणाऱ्या शहरांच्या यादीत आज सोलापूर दुसऱ्या नंबरवर आहे. सोलापुरात पेट्रोलचा दर 87.77 इतका आहे. तर काल दुसऱ्या नंबरवर असलेल्या औरंगाबादच्या नंबर तिसरा लागला आहे. औरंगाबादेत लिटरसाठी 87.76 रुपये मोजावे लागतात. महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर मुंबई – 86.72 पुणे 86.52 ठाणे – 86.80 नाशिक 87.10 औरंगाबाद – 87.76 नागपूर – 87.20 कोल्हापूर 86.90 सोलापूर – 87.77 अमरावती – 87.97   सिंधुदुर्ग – 87.63 अहमदनगर – 86.57 आंतरराष्ट्रीय बाजाराचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, असं पेट्रोल डिलर फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे उदय लोध यांनी सांगितलं. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं लोध म्हणाले. सरकारने एक्साईज ड्युटी आणि अन्य करात कपात करणं गरजेचं आहे, तरच इंधनाचे दर आटोक्यात येतील, असं ते म्हणाले. संबंधित बातम्या 

आणखी >>

आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी कायम

मुंबई : टीम इंडियाला साऊदम्प्टन कसोटीत इंग्लंडकडून हार स्वीकारावी लागली, मात्र कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या अव्वल कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट यावेळीही पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने साऊदम्प्टन कसोटीत 46 आणि 58 धावांच्या खेळी केल्या. या कामगिरीनंतर त्याच्या खात्यात आता 937 रेटिंग गुण झाले आहेत. कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत विराटची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विराटने इंग्लंड दौऱ्यातल्या आठ कसोटी डावांमध्ये 544 धावांचा रतीब घातला. भारताचा चेतेश्वर पुजारा आयसीसीच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर दाखल झाला आहे. मोहम्मद शमीनेही 19 वं स्थान मिळवलं आहे. जसप्रीत बुमराहने 37 वं स्थान राखलं आहे. आयसीसीची कसोटी फलंदाजांची क्रमवारी 1. विराट कोहली 2. स्टीफन स्मिथ 3. केन विल्यमसन 4. डेव्हिड वॉर्नर 5. ज्यो रुट 6. चेतेश्वर पुजारा 7. दिनेश कानुरत्ने 8. दिनेश चंडीमल 9. डीन एल्गर 10. एडन मार्क्रम

आणखी >>

राज ठाकरे कुणाला घाबरतात?

पुणे : आपल्या रोखठोक भाषणातून ‘ठाकरी शैली’चे फटकारे देत, भल्याभल्यांना घाम फोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकीय क्षेत्रात भलेभले घाबरुन असतात. मात्र, दस्तुरखुद्द राज ठाकरे कुणाला घाबरतात, हे तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नाचे उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिले आहे. त्याचं झालं असं की, पुण्यातील ओतूरमध्ये आज राज ठाकरे आले होते. ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी आपण कुणाला घाबरतो, हे राज ठाकरेंनी सांगितलं. कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानांची आपल्याला भीती वाटते, अशी कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. अर्थात, राज ठाकरे यांचं हे विधान ऐकून आजूबाजूला असणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्काच बसला. कारण राजकारणात भल्याभल्यांना आपल्या ठाकरी शैलीने घाम फोडणारे राज ठाकरे कुणाला घाबरतात, हे पहिल्यांदाच त्यांनी सांगितले.

आणखी >>

73 वर्षीय वृद्धाने तिसऱ्या थरावर चढून फोडली दहीहंडी

पालघर : दहीहंडी उत्सवामुळे सर्वांमध्ये जोश संचारला होता. पालघरमध्ये 73 वर्षीय वृद्धाने तिसऱ्या थरावर चढून दहीहंडी फोडली. विक्रमवीर आजोबा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते. पालघरमधील वाडा शहरात शिवाजी नगर मित्र मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान यावर्षी पुन्हा एकदा 73 वर्षीय लक्ष्मण साळुंखे यांनी मिळवला. शरीराने अत्यंत काटक असलेल्या या आजोबांनी तिसऱ्या थरावर चढून पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडली. गेल्यावर्षीसुद्धा लक्ष्मण साळुंखेंनी तिसऱ्या थरावर चढून पहिल्याच प्रयत्नात हंडी फोडली होती. तरुणपणी मुंबईत असताना लक्ष्मण साळुंखे हे गोविंदा पथकात सहभागी व्हायचे. सेवानिवृत्तीनंतर ते वाड्यातील शिवाजी नगरमध्ये रहायला गेले. या भागातील सर्वच सण, उत्सवात ते हिरीरीने सहभागी होत असतात. या धाडसाचं खास कौतुक आणि सत्कार करुन लक्ष्मण साळुंखेंना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मुंबईसह

आणखी >>

डॉल्बी कोण बंद करतंय बघतोच : उदयनराजे

सातारा : साताऱ्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून विविध ठिकाणी गोविंदा पथक दहीहंडी फोडत आहेत. डॉल्बीच्या आवाजावरुन वाद रंगलेले असताना खासदार उदयनराजे यांनी आवाज वाढवला आहे. 'डॉल्बी कोण बंद करतंय हे बघतोच' असं म्हणत उदयनराजेंनी आव्हान दिलं आहे. 'दहीहंडीचे कार्यक्रम सुरु आहेत. यात वाजणारे डॉल्बी कोण बंद करतंय हे बघतोच. दहीहंडी किंवा गणपती उत्सव हे लोकांचे महत्त्वाचे सण असून डॉल्बीच्या आवाजावर पोलिसांनी बंधन घालू नयेत' असंही उदयनराजे म्हणाले. 'डॉल्बी वाजवणारच. मग गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. डॉल्बी कोण बंद करतंय बघूच. डॉल्बीवर मीच बसणार आहे' असं म्हणत उदयनराजेंनी कायद्याला जणू आव्हानच दिलं. मुंबईसह

आणखी >>

रवी शास्त्री आणि निमरत कौर यांच्या अफेअरची चर्चा

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं खास कनेक्शन आहे. क्रिकेटविश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांची नाती जुळल्याची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. आता यात टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर यांचं नाव समोर येत आहे. माजी क्रिकेटर रवी शास्त्री आणि निमरत कौर मागील दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. 2015 मध्ये एका कार लॉन्चिंगच्या निमित्ताने रवी शास्त्री आणि निमरत कौर यांची भेट झाली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. रवी शास्त्री यांनी 1990 मध्ये रितू सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र 22 वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. रवी शास्त्री आणि रितू सिंह यांच्यात अनेक काळापासून वाद सुरु होते. त्यानंतर दोघांनी संसार मोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांना अलका नावाची एक मुलगी आहेत. रितू सिंह यांच्याशी लग्न होण्याआधी रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्या अफेअरची चर्चा होती. त्यावेळी अमृता सिंह स्टेडियममध्ये जाऊन रवी शास्त्री यांना चिअर करायची. पण अमृता आणि रवी यांचं होऊ शकलं नाही. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. तर निमरत ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये दिसली होती. निमरत इरफान खानच्या 'लंच बॉक्स'मध्ये झळकली होती. याशिवाय तिने 'एअरलिफ्ट'मध्ये अक्षय कुमारसोबत काम केलं होतं.

आणखी >>

चौथी कसोटी : इंग्लंडची भारतावर मात, मालिकाही खिशात

साऊदम्प्टन : चौथ्या कसोटीत इंग्लंडने भारतावर मात केली असून, भारताच्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचा संघर्ष अखेर अयशस्वी ठरला आहे. इंग्लंडने साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीसह मालिकाही खिशात घातली आहे. इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 184 धावांत गुंडाळून साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीत 60 धावांनी विजय साजरा केला. इंग्लंडने ही कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. चौथ्या कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडला दुसऱ्या डावात 271 धावांत रोखलं. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 245 धावांचं आव्हान होतं. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 101 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता, भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या आक्रमणासमोर पुन्हा लोटांगण घातलं. विराट कोहलीनं 58, तर अजिंक्य रहाणेनं 51 धावांची झुंजार खेळी उभारली. भारताच्या अन्य नऊ फलंदाजांनी मिळून 73 धावाच जमवल्या.

आणखी >>

जेव्हा पोलिस राज ठाकरेंना वाहतूक नियम समजावतात...

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. राज ठाकरेंनीही पोलिसांकडून वाहतुकीसंदर्भातील उपक्रमांची माहिती अगदी मन लावून ऐकली. नेमकं काय झालं? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद-धुळे दरम्यान प्रवास करत होते. त्यावेळी आलापूर-खुलताबाद येथे महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ थांबून सीटबेल्ट, हेल्मेट वापरणे याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी, महामार्ग पोलिसांनी राज्यामध्ये करत असलेल्या या प्रबोधनात्मक, तसेच सामाजिक उपक्रमाबद्दलही राज ठाकरेंना सविस्तर माहिती दिली.

आणखी >>

सातारा | ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी धरला ठेका!

साताऱ्यातील गांधी मैदानावर आज अनोखं चित्र पाहायला मिळालं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी चक्क गाण्यावर ठेका धरला. गांधी मैदानावर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तेथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं आगमन झालं.
शिवेंद्रराजे आल्यानंतर उपस्थित तरुणवर्गात एकच उत्साह संचारला. एकंदरीत उत्साहाचं वातावरण असतानाच, मोठ-मोठ्याने गाणी लावण्यात आली.
‘मैं हूँ डॉन... मैं हूँ डॉन’ हे गाणं तिथे वाजवण्यात आल्यानंतर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही गाण्यावर ठेका धरला. मग काय... उपस्थित तरुणांनीही एकच जल्लोष सुरु केला.

आणखी >>

एक वर्षापूर्वी सचिनशी तुलना, आता चाहत्यांकडून निवृत्तीचा सल्ला

मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढेल, असं बोललं जायचं. असं म्हणणाऱ्यांमध्ये क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचा समावेश होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. अॅलिस्टर कूकला आता निवृत्तीचा सल्ला दिला जातोय. 2017 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत जेव्हा कूकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 244 धावांची खेळी केली, तेव्हा त्याचं जगभरात कौतुक झालं. पण एका वर्षातच चित्र बदललं. यावर्षात कूकने नऊ कसोटी (भारताविरुद्ध साऊदम्पटन कसोटीपर्यंत) सामने खेळले आहेत, मात्र एकही शतकी खेळी करता आलेली नाही. यावर्षी त्याने 16 डावांमध्ये 18.62 च्या सरासरीने केवळ 298 धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकीय (70 धावा) खेळीचा समावेश आहे. या खराब कामगिरीमुळे कूकची सरासरी गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच 45 च्या खाली आली आहे. भारताविरुद्ध 2006 मध्ये शतकी खेळीने करिअरची सुरुवात करणाऱ्या कूकची सरासरी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 235 धावांची नाबाद खेळी केल्यापासून 45 च्या खाली कधीही आली नाही. एकापाठोपाठ एक सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम बनवणाऱ्या कूकने आतापर्यंत 160 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 12254 धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या कूकवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.  

आणखी >>

बापट साहेब, साताऱ्यातून खासदारकी लढवा, मी माघार घेतो : उदयनराजे

सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या बेधडक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना उत्तर देणं असो वा, सरकारला इशारा असो, ते कधीही हातचे राखून बोलत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. साताऱ्यातील आजच्या कार्यक्रमातही उदयनराजेंच्या वक्तृत्त्वाची खास स्टाईल दिसून आली. इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या सातारा शाखेच्या उद्‌घाटन प्रसंगी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट आणि खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी बापटांना साताऱ्यातून खासदारकी लढवण्याची ऑफर देऊन उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. अर्थात, त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत हे विधान केले, मात्र त्यामागील किस्साही त्यांनी सांगितला. “बापट साहेबांच्या येण्यामुळे मन प्रफुल्लित होते. एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. मी त्यांना गाडीतून येताना सांगितले, बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या. म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. बापटसाहेबांची इच्छा असेल तर त्यांनी साताऱ्यातून उभे रहावे, मी माघार घेईन.”, अशी जाहीर ऑफरच उदयनराजेंनी गिरीश बापटांना दिली. गिरीश बापट यांनीही या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंबद्दल आदर व्यक्त केला. शिवाय, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागचं कारणही सांगतिले. गिरीश बापट म्हणाले, “या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे आहेत, हे समजल्यामुळे मी पुण्याचा कार्यक्रम रद्द करून साताऱ्याच्या कार्यक्रमाला खास आलो. कारण व्यासपीठावर उदयनराजेंसोबत असणे, यासाठी भाग्य लागते. पूर्वी आम्ही अनेकदा एका व्यासपीठावर होतो. आज या निमित्ताने महाराज येथे आहेत. मला जुनी पोटनिवडणूक आणि खासदारकीची निवडणूक आठवते. उदयनराजे असले, की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांला उत्साह येतो. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो.” एकंदरीत गिरीश बापट आणि उदयनराजे भोसले यांच्या भाषणांनी या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.

आणखी >>
  • 1