काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

भिवंडीत 14 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या

ठाणे : एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात घडली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अज्ञात आरोपीविरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आई-वडील आणि मोठ्या बहिण-भावासह मानकोली परिसरात राहते. याच परिसरातील शाळेत ती शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे आई-वडील गोदामात सकाळच्या सुमारास कामावर गेले. शाळेतून आल्यानंतर पीडित मुलगी घरात एकटीच होती. हीच संधी साधून नराधमाने बलात्कार केला आणि आपलं बिंग फुटणार या भीतीने मुलीची टबमध्ये बुडवून हत्याही केली. पीडितेचा लहान भाऊ घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आता अज्ञात आरोपीविरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

आणखी >>

एक कोटींचं इनाम असलेला कुख्यात नक्षली पहाडसिंगचं आत्मसमर्पण

नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये अनेक नक्षली कारवाया करणारा नक्षल्यांचा म्होरक्या पहाडसिंग पोलिसांना शरण आला. छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केलं. विविध राज्यांनी मिळून त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं. पहाडसिंग गेल्या काही वर्षात गोंदियातील सीमा भागात सक्रीय होता. पहाडसिंग हा अशोक, टिपू सुलतान, कुमारसाय कतलामी, बाबुराव तोफा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात होता. चार राज्यात त्याच्यावर 80 गुन्हे दाखल असून जाळपोळ, हत्या, भूसुरुंग स्फोट यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. पहाडसिंगवर महाराष्ट्र पोलिसांनी 16 लाख, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी 25 लाख रुपयांचं इनाम होतं. पहाडसिंग हा नक्षल संघटनेचा विशेष विभागीय सदस्य होता, तर महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड समितीचा विभागीय सदस्यही होता. या तीन राज्यांसह ओदिशातील अनेक नक्षली कार्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. *पहाडसिंग छत्तीसगडच्या राजनांदगाव मधील झुरिया गावचा रहिवासी होता. त्याला राजकारणात रस होता. * 2002-03 मध्ये त्याची बायको सरपंच होती, पण मित्रांनीच अविश्वास प्रस्ताव आणला * पत्नीचा पराभव झाल्यामुळे नाराज होऊन मित्रांना धडा शिकवण्यासाठी त्याने नक्षल जॉईन केले, पण बदला घेता आला नाही * गडचिरोलीत 35 ते 36 गुन्हे दाखल * पहाडसिंग आधी खोब्रामेंढा, नंतर तांडा दलममध्ये होता, गोंदिया बॉर्डरवरही तो सक्रिय होता * परत ये, नक्षली चळवळ सोड असं पत्र  2013 मध्ये गडचिरोली पोलिसांनी त्याच्या वडिलांकडून लिहून घेतलं होतं

आणखी >>

राज्यातील 1041 ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबरला मतदान

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 26 जिल्ह्यांमधील 1041 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्तपदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. या ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबर रोजी मतदान होईल, तर 27 सप्टेंबरला मतमोजणी होईल. या ठिकाणी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. कसा आहे निवडणूक कार्यक्रम? नामनिर्देशनपत्रे 5 ते 11 सप्टेंबर 2018 छाननी 12 सप्टेंबर 2018 रोजी नामनिर्देशनपत्रे  15 सप्टेंबर 2018 पर्यंत मागे घेता येतील आणि त्याच दिवशी चिन्ह वाटप मतदान 26 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 27 सप्टेंबर 2018 रोजी कोणकोणत्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक? ठाणे- 6, रायगड- 121, रत्नागिरी- 19, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 24, धुळे- 83, जळगाव- 6, अहमदगनर- 70, नंदुरबार- 66, पुणे- 59, सोलापूर- 61, सातारा- 49, सांगली- 3, कोल्हापूर- 18, बीड- 2, नांदेड- 13, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 3, नागपूर- 381, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 5 आणि गडचिरोली- 5. एकूण- 1041. कोणकोणत्या ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक? ठाणे- 4, रायगड- 3, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 8, धुळे- 2, जळगाव- 1, पुणे- 6, सातारा- 3, सांगली- 10, उस्मानाबाद- 1, जालना- 2, यवतमाळ- 3, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 1, चंद्रपूर- 2 आणि गडचिरोली- 14. एकूण- 69.

आणखी >>

राजकीय सभेत गाण्याचा वापर, गीतकाराचे थेट ट्रम्पना खडे बोल

वॉशिंग्टन : कलाकारांनी न्याय्य गोष्टींसाठी व्यक्त झालं पाहिजे, असे म्हटले जाते. मात्र सर्वत्र ते होताना दिसत नाही. कारण राजकारण्यांच्या विरोधात जाण्यास कुणी धजावत नाही. मात्र अमेरिकन गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेता स्टीव्हन टेलर यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच खडे बोल सुनावले आहेत. मंगळवारी (21 ऑगस्ट) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी त्यांच्या एका राजकीय सभेत ‘लिव्हिन ऑन द एज’ या गाण्याचा वापर केला. स्टीव्हन टेलर हे या गाण्याचे सह-गीतकार आहेत. स्टीव्हन टेलर, जो पेरी आणि मार्क हड्सन यांनी एकत्रितपणे हे गाणं लिहिलं आहे. यासंदर्भात स्टीव्हन टेलर यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून, त्यांच्याकडून यासंदर्भात येत्या 24 तासात उत्तराची विनंती केली आहे. स्टीव्हन टेलर यांनी यासंदर्भात ट्वीटमध्ये म्हटले की, “हे काही रिपब्लिकन्स किंवा डेमोक्रॅट्समधील राजकीय युद्ध नाही. मी कुणालाही माझी गाणी माझ्या परवानगीशिवाय वाजवण्यासाठी देत नाही. आणि माझी गाणी कुठल्या राजकीय अभियान किंवा सभांसाठी नाहीत.”

आणखी >>

पुण्यातील बेपत्ता मगर-सातव कुटुंबं अखेर सापडली

पुणे : पुण्यातून बेपत्ता झालेल्या दोन्ही कुटुंबांशी अखेर संपर्क झाला. पानशेतला फिरायला गेलेले मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. मात्र पुण्याच्या हवेली तालुक्यातच आज दोन्ही कुटुंबं सापडली. सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघं आपल्या कुटुंबासह पानशेतला फिरायला गेले होते. सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचं बहिणीशी फोनवरुन काल दुपारी 11 वाजता बोलणं झालं होतं. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद येत होते, त्यामुळे कुटुंबीय काळजीत पडले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पानशेतमधील गुंजन रिसॉर्टमध्ये सातव आणि मगर कुटुंब मुक्कामाला होती. अतिपावसामुळे कोणाच्याच मोबाईल रेंज नव्हती. 'एबीपी माझा'ची बातमी रिसॉर्टमध्ये पाहिल्यावर त्यांनी रिसॉर्टमधील लँडलाईनवरुन संपर्क साधला. दोन्ही कुटुंबं आता पुण्याकडे यायला निघाली आहेत. पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या दोन्ही कुटुंबप्रमुखांचा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मगर आणि सातव कुटुंबीय सिद्धार्थ उर्फ हरीश सदाशिव मगर (38 वर्षे) स्नेहल उर्फ ईश्वरी मगर जुळ्या मुली – आरंभी आणि साईली (5 वर्षे) [caption id=

आणखी >>

पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातील सात जण बेपत्ता

पुणे : पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या दोन कुटुंबांशी कालपासून संपर्क होत नाहीये. मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले आहेत. दोन्ही कुटुंबप्रमुखांचा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघं आपल्या कुटुंबासह पानशेतला फिरायला गेले होते. त्यांनी खडकवासलामधील अॅक्वेरियस हॉटेलात मुक्कामही केला. सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचं बहिणीशी फोनवरुन दुपारी 11 वाजता बोलणं झालं होतं. मात्र काल (बुधवारी) दुपारी 11 वाजल्यापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद येत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस या दोन्ही कुटुंबांचा शोध घेत आहेत. कोण कोण बेपत्ता? सिद्धार्थ उर्फ हरीश सदाशिव मगर (38 वर्षे) स्नेहल उर्फ ईश्वरी मगर जुळ्या मुली – आरंभी आणि साईली (5 वर्षे) जगन्नाथ हरी सातव पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा

आणखी >>

तुम्ही वांग्याचं भूत केलं, तुमचं तोंड बघायचं नाहीय : संभाजी भिडे

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूणमध्ये बैठकीसाठी आलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी माध्यमांवर आगपाखड केली. चिपळुणात भिडेंच्या सभेला झालेल्या तीव्र विरोधावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी, “गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन विषय चघळत ठेवलात”, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले? “तुम्ही बेकार आहात. गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन, विषय चघळत ठेवलात. मला तुमचं तोंड बघायचं नाही.” असे संभाजी भिडे माध्यमांना उद्देशून म्हणाले. चिपळुणात भिडेंच्या सभेला तीव्र विरोध श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना काल चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान मोठा विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र अशा परिस्थितीत संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक जवळपास तीन तास चालली. गाडीत मागच्या सीटवर बसण्यास भिडेंचा नकार बैठक संपल्यानंतर संभाजी भिडेंना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात तेथून बाहेर काढले. भिडे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना इनोव्हा गाडीत मागे बसण्याची विनंती केली. मात्र, मी पुढच्या सीटवर बसणार, असा आग्रह धरला. अखेर पोलिसांनाही त्यांचं ऐकावं लागलं आणि त्यांना पुढल्या सीटवर बसण्यास सांगितले गेले. यावेळी भिडे म्हणाले, म्हणाले, “मी भित्रा नाहीय, ही मोगलाई आहे का? मी पुढल्या सीटवरच बसेन.” याच काळात दोन्ही मार्गावरील जमाव आक्रमक झाल्यामुळे संभाजी भिडेना जवळजवळ अर्धा तास गाडीत प्रतीक्षा करावी लागली. अखेर रत्नागिरी पोलिसांनी मार्ग मोकळा केला आणि रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे सभागृहातून मार्गस्थ होऊ शकले.  

आणखी >>

आधी विषप्राशन, मग गळफास, गावगुंडांमुळे तरुणीची आत्महत्या

औरंगाबाद : गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादेत 17 वर्षीय तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप केला जात आहे. चार दिवसांपूर्वी विष पिऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर आता गळफास घेतला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील तांदूळवाडीमध्ये 17 वर्षीय प्रियंका मोरे राहत होती. गावातील तरुण तिला फोन करुन नेहमी त्रास देते असत. त्याचप्रमाणे घरी कुणी नसल्यावर घरी येऊनही त्रास देत असत, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. गावगुंडाच्या त्रासाला कंटाळूनच प्रियंकाने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. प्रियंकाने चार दिवसापूर्वी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला होता. परंतु त्यानंतर प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आणखी >>

तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने लूट, निशा फ्रेंडशीप क्लबचा पर्दाफाश

नागपूर : हायप्रोफाइल मॉडेल्स आणि महिलांसोबत मैत्रीचे आमिष दाखवत आंबटशौकीन पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. ठाण्यातून चालवल्या जाणाऱ्या या रॅकेटमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा शहरातील काही महिलाही कार्यरत होत्या. यासाठी 'निशा फ्रेंडशिप' नावाचा क्लब स्थापन करण्यात आला होता. मॉडेल्स, एअर होस्टेस, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांशी तुम्हाला गप्पा मारता येतील आणि मोबदल्यात पैसेही मिळतील, असं सांगितलं जायचं. त्यानंतर संबंधित महिला फ्रेंडशिप क्लबमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या पुरुषांसोबत फोनवर बोलायच्या आणि त्यांना भेटण्याचं आमिष दाखवून क्लबच्या विविध अकाऊंट्समध्ये रक्कम भरण्यास सांगायच्या. ही रक्कम काही हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंत असायची. मुख्य आरोपी रितेश भैरुलाल याने पुण्यातील विविध बँकांमध्ये तब्बल 28 अकाऊंट्स उघडले होते. अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक अशा अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवलं जायचं. एकदा पैसे भरले की आरोपी ते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करायचे. नागपूरच्या एका व्यक्तीकडून सव्वा लाख रुपये लुबाडले गेले. औरंगाबादमधील एका व्यक्तीकडून साडेचार लाख रुपये उकळले गेले. पोलिसांच्या मते राज्यभरात ही संख्या शेकडोच्या घरात असून फसवणुकीची रक्कम काही कोटींच्या घरात असू शकते. फसवणूक झाल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीने अनेक जण लाखो रुपये गमावूनही तक्रार करत नव्हते.

आणखी >>

खात्यातील पैसे मुलीला द्या, चिठ्ठी लिहून बॉलिवूड डान्सरची आत्महत्या

मुंबई: बॉलिवूडमधील अनेक सिनेमात डान्स केलेल्या डान्सरने आत्महत्या केली आहे. अभिजीत शिंदे असं या 32 वर्षीय डान्सरचं नाव आहे. अभिजीतने बुधवारी भांडुपमधील राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या सुसाईड नोटमधील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र कौटुंबिक तणाव, आर्थिक चणचण आणि काही दिवसांपासून काम न मिळाल्याने, अभिजीतने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या आत्महत्येची नोंद भांडुप पोलिसात झाली आहे. कौटुंबिक तणाव दरम्यान, अभिजीतच्या कुटुंबात सध्या तणाव होता. त्याची पत्नी तीन महिन्यांपासून त्याच्यासोबत राहात नव्हती. अभिजीतला दोन वर्षांची मुलगी आहे. मात्र पत्नी अभिजीतला मुलीला भेटू देत नव्हती. त्यामुळे अभिजीत तणावात होता, असं पोलिसांनी सांगितलं. या तणावातून अभिजीतने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आयुष्य संपवलं. अभिजीत राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे काही शेजाऱ्यांनी चौकशी केली असता, अभिजीतने गळफास घेतल्याचं समोर आलं. शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अभिजीतला रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.  बँक खात्यातील पैसे मुलीला द्या अभिजीतजवळ जी सुसाईड नोट आढळली आहे, त्यात त्याने आपल्या बँक खात्यातील पैसे मुलीला द्या असं म्हटलं आहे. दिग्गजांसोबत काम दरम्यान, अभिजीतने बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. रणबीर कपूर, रणवीर सिंह यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत. बॉलिवूडमधील सहकलाकार असो किंवा अभिजीतसारखे डान्सर असो, अशा कलाकारांचा संघर्ष, स्ट्रगल हा लपून राहिलेला नाही. कामाच ताण असो वा कौटुंबिक तणाव, विविध कारणांनी अनेक कलाकारांनी आयुष्य संपवलं आहे. त्यात सातत्याने वाढच होत आहे.

आणखी >>

सेल्फी काढताना नदीत पडून मुलासह आई-वडील वाहून गेले

बुलडाणा : नदीवरील पुलाच्या कडेवरुन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलासह त्याचे आई-वडीलही वाहून गेले. बुलडाण्यातील खिरोडा भागात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब नदीत वाहून गेलं. बुलडाण्यात शेगाव-संग्रामपूर रस्त्यावर पूर्णा नदीजवळ ही घटना घडली. बुलडाणा अर्बन बॅंकेत लिपिक पदावर कार्यरत असलेले 46 वर्षीय राजेश चव्हाण आपली पत्नी सारिका आणि मुलासह सेल्फी काढत होते. त्यावेळी राजेश यांचा बारा वर्षांचा मुलगा श्रवणचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. लेकाला वाचवण्यासाठी राजेश यांनी नदीत उडी मारली, त्यापाठोपाठ त्यांच्या पत्नीनेही मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. पण नदीच्या पाण्याला वेग असल्यामुळे तिघेही वाहून गेले. राजेश चव्हाण हे शेगाव तालुक्यातील कवठा गावचे रहिवासी होते. पूर्णा नदीला मोठा पूर आला असून पुलाच्या दहा फूट खाली पाणी वाहत आहे. नदीपात्रात तिघांचा शोध घेतला जात आहे मात्र या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी >>

पैशांच्या पावसासाठी नरबळीचा प्रयत्न, शिक्षकासह तिघेजण अटकेत

अकोला : पैशांच्या पावसासाठी नरबळीच्या प्रयत्न करु पाहणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. सुधाकर राजाराम सोळंके असे या शिक्षकाचे नाव आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी काल (22 ऑगस्ट) रात्री ही कारवाई केली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य संघटक पुरुषोत्तम आवारे-पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नरबळीचा प्रयत्न करणाऱ्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुधाकर राजाराम सोळंके हा शिक्षकच आहे. तो अकोल्याच्या देशमुखफैल भागात असलेल्या शिवाजी शाळेत शिक्षक आहे. याशिवाय पोलिसांनी त्याचे साथीदार असणाऱ्या शंकर मदनकार आणि अमोल चव्हाण यांनाही अटक केली. ही टोळी नरबळी देण्यासाठी 25 ते 30 वयोगटातील अविवाहित तरुणाच्या शोधात होती. या टोळीने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील धनजलगतच्या एका तांत्रिकाचीही मदत घेऊ केली होती. या संपूर्ण प्लानची कुणकुण अकोल्यातील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना लागली. त्यांच्या पोलीस तक्रारीवरुन एक मोठा गुन्हा घडण्याआधीच उघडकीस आली. दरम्यान, पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून 'आप'नेते मुकीम अहमद यांची झालेली हत्या, संपत्तीच्या वादातून झालोली भारिप-बहुजन संघाचे नेते आसिफखान यांची हत्या आणि काल अकोला पोलिसांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांची अटक... अकोल्यातील अलिकडच्या काही घटना समाजमन हादरविणाऱ्या आहेत.

आणखी >>

मुरली विजयला डच्चू, पृथ्वी शॉ भारतीय संघात!

नॉटिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर फलंदाज मुरली विजयच्या जागी त्याला संधी देण्यात आली. भारतीय संघातील दुसरा बदल म्हणजे हैदराबादचा युवा फलंदाज हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघातील हा दुसरा मोठा बदल आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त तीन सामन्यांसाठीच भारतीय संघ निवडण्यात आला होता. इंग्लंडविरुद्धचे उर्वरित दोन कसोटी सामने 30 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर रोजी अनुक्रमे साऊथेम्पटन आणि लंडनमध्ये खेळवण्यात येणार आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत भारताने आजच इंग्लंडवर विजय मिळवला. त्यानतंर नॉटिंगहॅममध्येच निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हनुमा विहारी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर पृथ्वी शॉला कामाची पावती विश्वविजेत्या अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ सध्या दमदार फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या प्रथम श्रेणी सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. रणजी आणि दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉच्या नावावर आतापर्यंत सात शतकं आणि पाच अर्धशतकं आहेत. कोण आहे हनुमा विहारी? हैदराबादच्या 24 वर्षीय हनुमा विहारीने दमदार कामगिरी केली आहे, ज्याच्या बळावर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 15 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

आणखी >>

गाव-खेड्यातील सर्व अतिक्रमणं नियमित, सरकारचा मोठा निर्णय

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील सरकारी जागेवरील सर्व अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वीची सर्व बांधकामे नियमित केले जातील. गायरान, गावठाणे, सरकारी उकिरडे, खळवाढीच्या सरकारी जागांवरची सर्व बांधकामं नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे आता मागासवर्गीय वस्त्या नियमित होतील. अल्प पैसे भरुन सर्व बांधकाम नियमित करता येतील. आदर्श प्रकरणानंतर 2013 साली सरकारी जागेवरची अतिक्रमण नियमित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय सरकारने आता बदलला असून, 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटीशांनी खळे करण्यासाठी, जनावरे उभी करण्यासाठी, चराईसाठी, वाढच्या वस्तीसाठी गावठाणाच्या जमिनी निश्चित केल्या होत्या. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. विशेषत: मागास समाजाच्या वस्त्या तयार झाल्या होत्या. याचे राजकीय परिणामही होत होते. या सगळ्या जागांवरची सर्व बांधकामे आता नियमित होणार आहेत.

आणखी >>

दहा मिनिटांत खेळ खल्लास, भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय

लंडन : टीम इंडियाने अखेर इंग्लंडचा दुसरा डाव 317 धावांत गुंडाळून नॉटिंगहॅम कसोटीत 203 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी 1-2 अशी भरुन काढली. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच खेळ खल्लास झाला. इंग्लंडच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 11 वाजता पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि 11 वाजून 10 मिनिटांनी आर अश्विनने जेम्स अँडरसनला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या कसोटीत इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचं आव्हान होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी उपाहाराला इंग्लंडची 4 बाद 84 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण

आणखी >>

कोल्हापूरच्या राही सरनोबतचा सुवर्णवेध, भारताला आणखी एक गोल्ड

जकार्ता: कोल्हापूरच्या राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धा गाजवली आहे. राहीने 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला मिळालेलं हे चौथं सुवर्णपदक आहे. 27 वर्षीय राहीने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. मात्र याच प्रकारात स्टार नेमबाद मनू भाकरने निराशा केली. फायनलमध्ये 16 वर्षीय मनूला केवळ 16 गुणच मिळवता आले. मात्र राहीने तिची कसर भरुन काढत थेट सोनं टिपलं. शेवटच्या मालिकेत राहीचे तीनही लक्ष्य चुकले होते. मात्र दबावामुळे थायलंडच्या नेमबाजाचेही निशाणे चुकले. त्यानंतर दोघींमधील निर्णय शूटऑफने झाला. त्यामुळे या दोघींमधील फायनल अत्यंत चुरशीची झाली. शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याचा अंदाजच लावता येत नव्हता. मग शेवटच्या मालिकेत राहीने केवळ 2 निशाणे चुकवले. मात्र थायलंडच्या नेमबाजाने 3 निशाणे चुकवल्याने राहीने एशियाडमध्ये तिरंगा उंचावला. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी राही ही पहिली भारतीय महिला शूटर ठरली आहे. राहीने 2010 दिल्ली आणि 2014 ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. यानंतर ती जखमी झाल्याने तिने ब्रेक घेतला होता. पण पुन्हा राहीने कंबर कसून जिद्दीने मेहनत घेतली. त्याचं फळ आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या रुपाने मिळालं. संबंधित बातम्या

आणखी >>

बटलर-स्टोक्सची टिच्चून बॅटिंग, रशिदने भारताचा विजय लांबवला

लंडन: इंग्लंडच्या झुंजार फलंदाजीनं नॉटिंगहॅम कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतीक्षा करायला भाग पाडलं आहे. या कसोटीत जसप्रीत बुमरानं दुसऱ्या नव्या चेंडूवर इंग्लंडची पुन्हा दाणादाण उडवून, टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. पण तळाच्या तीन फलंदाजांनी केलेल्या संघर्षानं इंग्लंडला चौथ्या दिवसअखेर नऊ बाद 311 धावांची मजल मारुन दिली. त्यामुळे भारताला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ही कसोटी जिंकण्यासाठी भारताला केवळ एकच विकेट हवी असून,  521 धावांचं डोंगराएवढं आव्हान असलेली इंग्लंड अजून 210 धावांनी पिछाडीवर आहे. नॉटिंगहॅम कसोटीत चौथ्या दिवशी उपाहाराला इंग्लंडची चार बाद 84 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण शतकवीर बटलर आणि स्टोक्सनं पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय लांबवला. बटलरआणि स्टोक्सने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. पहिल्या चार विकेट झटपट गेली असताना, पाचव्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागला. बटलरने 106 तर बेन स्टोक्सने 62 धावा केल्या. अखेर बुमराने बटलरला पायचीत करुन, ढेपाळलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये चैतन्य आणलं. त्यानंतर मग दुखापतग्रस्त जॉनी बेयरस्टोला शून्यावर माघारी धाडत, बुमरानेच भारताला सहावी विकेट मिळवून दिली. 83 व्या षटकात बुमराहने या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानतंर मग 85 व्या षटकात बुमराने ख्रिस वोक्सला ऋषभ पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडलं. वोक्स केवळ 4 धावा करुन माघारी परतला. मग रशिद आणि ब्रॉड या जोडीनं नवव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचून भारताचा विजयाचा मार्ग अडवून धरला.  त्यासाठी भारतीय गोलंदाजांना आज पुन्हा मैदानात उतरावं लागणार आहे. जसप्रीत बुमराने भेदक मारा करत, सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. ईशांत शर्मानं दोन, शमी आणि पंड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यामुळं चौथ्या दिवसअखेर इंग्लंड संघ नऊ बाद 311 अशा पराभवाच्या उंबरठ्यावर होता. जेम्स अँडरसन 8 आणि अदिल रशिद 30 धावांवर खेळत आहेत. भारतीय गोलंदाज आज ही जोडी फोडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील.

आणखी >>

IAS मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांना जुळ्या मुली

मुंबई : मुलाच्या आत्महत्येनंतर म्हैसकर कुटुंबात आलेला रितेपणा काहीसा दूर होताना दिसत आहे. आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरी जुळ्या मुलींचं आगमन झाल्याचं वृत्त आहे. म्हैसकरांचा 18 वर्षीय मुलगा मन्मथने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने मनिषा म्हैसकर यांनी मुंबईत जुळ्या मुलींना जन्म दिला. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. वयाच्या 49 व्या वर्षी मनिषा म्हैसकर यांना पुन्हा मातृत्वसुख लाभलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरोगेट मदरच्या माध्यमातून म्हैसकर कुटुंबात दोन चिमुकल्या जन्मल्या. 50 वर्षीय मिलिंद म्हैसकर म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत, तर मनिषा म्हैसकर नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. डिसेंबर 2017 मध्ये म्हैसकर दाम्पत्याने पुन्हा एकदा पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याविषयी म्हैसकर दाम्पत्याच्या निकटवर्तीयांनाचा माहिती होती. देवाचे आशीर्वाद आणि पुढारलेल्या तंत्रज्ञानामुळेच आपली रिती ओंजळ भरल्याच्या भावना मनिषा यांनी व्यक्त केल्या. 18 जुलै 2017 रोजी

आणखी >>

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील पाच महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (21 ऑगस्ट) पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती, ग्रामपंचायतींच्या कामात गतिमानता आणण्यासाठी योजनेत सुधारणा यांसह इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीच्या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेती मालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात या मिशनच्या माध्यमातून बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यातही व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींच्या सहभागासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी सुधारणा राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या सुधारणांमुळे अधिकाधिक ग्रामपंचायती योजनेच्या लाभास पात्र ठरणार असून त्यांना स्थानिक प्रशासनासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्वतंत्र प्रशासकीय इमारत नसणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी 23 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या 2018-19 मधील अंमलबजावणीसाठी 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता प्रतिवर्षी 142 कोटी 43 लाख रुपयांप्रमाणे पुढील चार वर्षांसाठी 569 कोटी 72 लाख इतका निधी अर्थसंकल्पित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी त्यामध्ये विविध सुधारणा करण्यात येत आहेत. परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी राज्य शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची कमाल मर्यादा प्रतिवर्षी 20 इतकी राहील. त्यापैकी 10 विद्यार्थी खुल्या प्रवर्गाचे असतील तर उर्वरित 10 विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचे एकत्रितरित्या राहतील. खुल्या प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व प्रकारचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेखाली इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याच्या शिक्षणाचा फायदा राज्य शासनास होण्यासाठी शासन निर्णयामध्ये स्पष्टता करण्यात येईल. या योजनेंतर्गत खुल्या व अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीचा कमाल कालावधी पी.एच.डी. साठी 4 वर्ष, पदव्युत्तर पदवीसाठी 2 वर्ष आणि पदव्युत्तर पदविकेसाठी 1 वर्ष इतका राहणार आहे. एकूण लाभार्थ्यांपैकी 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. योजनेतील लाभासाठी दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये मिळालेले गुण आणि प्रवेश मिळालेल्या विद्यापीठाचे जागतिक नामांकन (THE/QS World Ranking) विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी अंदाजे 20 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासह आगामी हंगामात शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसे बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रमाणित व पायाभूत बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समितीने घोषित केलेला सरासरी दर यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी नवी योजना लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. खरीप व रब्बी हंगाम 2017-18 मध्ये तयार झालेल्या व 2018-19 पासून उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांसाठी ही योजना लागू असणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधान सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यासाठी 35 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. वृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिजनल जिरॅएट्रिक सेंटर स्थापन करण्यास आणि त्याअनुषंगाने सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या केंद्रामुळे वृद्धांसाठी आरोग्यविषयक सर्वंकष सोयीसुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. जीवनशैली तसेच आरोग्यमानात सुधारणा झाल्याने नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. परिणामी समाजात ज्येष्ठांची संख्या वाढती आहे. त्यांच्या आरोग्यविषयक विशेष काळजीसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रम (नॅशनल प्रोग्रॅम फॉर हेल्थ केअर ऑफ द एल्डरली-एनपीएचसीई) राबविण्यात येतो. त्या अंतर्गत नागपूरमध्ये स्थापन होणाऱ्या या विभागीय जिरॅएट्रिक सेंटरला केंद्राकडून 60 टक्के तर राज्याकडून 40 टक्के निधी देण्यात येईल.

आणखी >>

दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सचिन अंधुरेच्या नातेवाईक आणि मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सचिन अंधुरेच्या माहितीनंतर सीबीआय आणि महाराष्ट्र एटीएसने ही संयुक्त कारवाई केली. सचिन अंधुरेच्या नातेवाईक आणि मित्राच्या घरातून एक 7.65 bore पिस्तूल, तीन जिवंड काडतुसं, एक तलवार आणि एक कट्यार जप्त करण्यात आली आहे. दाभोलकरांची हत्या करण्यासाठी या पिस्तूलचा वापर केल्याचा संशय सीबीआयला आहे. सीबीआय ही शस्त्र फॉरेन्सिक तपासणीसाठी एफएसएलमध्ये पाठवणार आहे. तसंच याच पिस्तूलचा वापर कॉम्रेड गोविंद पानसरे, विचारवंत आणि प्राध्यापक एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्येही वापर झाला असावा, असा अंदाज तपास यंत्रणांना आहे. त्याचाही तपास सुरु आहे.

आणखी >>

शेकहँडला नकार दिल्याने मुस्लिम महिलेला नोकरी नाकारली!

स्टॉकहोम (स्वीडन) : नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीला गेल्यावर उमेदवार सर्वसाधारणपणे मुलाखतकर्त्यांचं मन रिझवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. स्वीडनमध्ये मुस्लिम महिलेने मुलाखतीनंतर मुलाखतकर्त्यांशी हात मिळवण्यास नकार दिला. या कारणामुळे नोकरी नाकारणाऱ्या कंपनीलाच तिने कोर्टात खेचलं. स्वीडनमध्ये राहणारी 24 वर्षीय फराह अलहजहा एका स्थानिक कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूला गेली होती. मुलाखत संपल्यानंतर मुलाखतकर्त्यांनी तिच्याशी शेकहँड करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्यास नकार दिला. त्यामुळे 'इगो दुखावलेल्या' मुलाखतकर्त्यांनी तिला नोकरी न देण्याचा निर्णय घेतला. 'युरोपीयन देश असल्यामुळे स्वीडनमध्ये हात मिळवण्याची पद्धत असू शकते, मात्र मी मुस्लिम धर्माच्या परंपरा मानते. त्यामुळे मी शेकहँड करण्याच्या विरोधात आहे.' असं फराहने म्हटलं. फराहने कोर्टात केस दाखल केली आणि ती जिंकलीसुद्धा. स्वीडनच्या लेबर कोर्टाने फराहची बाजू मान्य करत कंपनीवर 40 हजार क्रोनर म्हणजेच तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. 'मुलाखतकर्त्यांनी जाणूनबुजून चुकीचं वर्तन केलं. आमच्या देशात लैंगिक आणि धार्मिक समानतेचा आदर केला जातो.' असं कोर्टाने स्पष्ट केलं. कंपनीने आपला बचाव करताना लैंगिक समानतेची बाजू पुढे केली. महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांशी समान वर्तणूक केली जाते. त्यामुळे कुठलाही कर्मचारी शेकहँड करण्यास नकार देऊ शकत नाही, असा दावा कंपनीने केला. 'समानतेचा अर्थ फक्त शेकहँड करणं होत नाही, धर्माच्या कारणास्तव युवतीने नकार दिला होता' असं कोर्टाने स्पष्ट केलं.

आणखी >>

चॉकलेटमधून विष देऊन होणाऱ्या नवऱ्याला मारलं

ठाणे : कुटुंबीयांच्या संमतीने वधू-वरांनी एकमेकांना पसंत केलं. अवघ्या काही दिवसातच लग्नाचा बार उडणार होता. मात्र चार महिने उलटल्यानंतर भावी वधूला नवरा मुलगा पसंत नसल्याने तिने होणाऱ्या नवऱ्याला चॉकलेटमधून विष देऊन ठार मारल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना मृतक अरकमच्या मोबाईलवर झालेल्या दोघांच्या संभाषणामुळे उघडकीस आली. अरकम शमसुद्दीन अंसारी (24) असं मृत्यू झालेल्या भावी वराचं नाव आहे. तर समरीन अंसारी (20) असं गुन्हा दाखल झालेल्या भावी वधूचं नाव आहे. मृतक अरकम हा भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्मानीया अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहत होता. अकरम आणि समरीन यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांच्या सहमतीने अरकमचा समरीनसोबत निकाह ठरला. येत्या सात सप्टेंबरला दोघांचं लग्न होणार होतं. लग्न ठरल्यानंतर मोबाईलवरून दोघांमध्ये गुफ्तगू सुरु होती. अचानकपणे वधू समरीनचं अरकमवरुन मन उडालं. “तुला पाहून माझ्या मनात घृणा निर्माण होते, तू मला पसंत नाही. तू माझ्या जीवनातून निघून जा”, अशा भाषेत समरीन बोलू लागली. तेवढ्यावरच बोलून न थांबता, ''जर माझ्यावर तुझा जीव असेल तर, मी दिलेलं विष तू खाशील का?'' असं बोलून तिने चॉकलेटला विषारी औषध लावून ते खाण्यासाठी दिलं. होणाऱ्या बायकोचं मन जिंकण्यासाठी अरकमने विषारी चॉकलेट खाल्लं आणि तो काही वेळातच बेशुद्ध पडला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच अरकमला तातडीने स्व. काशिनाथ पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर अरकमचा मृत्यू झाला. पोलिसांना जबाब देताना मृतक अरकमने त्यावेळी घडलेल्या घटनेची माहिती दिली नव्हती. यामुळे भोईवाडा पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र अरकमच्या कुटुंबीयांनी समरीन आणि अरकम यांचं संभाषण मोबाईलमध्ये ऐकलं असता ऑडिओ पोलिसांकडे देत कारवाईची मागणी केली. पोलीस तपासात मृतक अरकमच्या मोबाईलवर झालेल्या दोघांच्या त्या संभाषणातूनच पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला. समरीनने अरकम पसंत नसल्याने कपटी मनाने चॉकलेटला विष लावून ते खाण्यास दिल्याचं उघडकीस झालं. दरम्यान, भोईवाडा पोलिसांनी भावी वधू समरीन हिच्याविरोधात भा.दं.वि. 306 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली. सोमवारी तिला न्यायालयात हजर केलं असता 23 आगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

आणखी >>

अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय

मुंबई : अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मास्टरमाईंड असल्याचा संशय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आहे. त्यामुळेच अमोल काळेची सखोल चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी घेण्याची तयारी डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय टीमने केली आहे. इतकंच नव्हे, तर अमोल काळे आणि वीरेंद्र तावडेच्या आदेशावरुनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे. कशी झाली दाभोलकरांची हत्या? डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे शूटर आहेत, तर या हत्येचे अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे सूत्रधार आहेत, असा दावा सीबीआयने केल्याचे सूत्रांनी सांगितले. अमोल काळेला गौरी लंकेश हत्या प्रकरणात बंगळुरु एसआयटीने अटक केली आहे. “दाभोलकरांच्या हत्येसाठी अमोल काळेने अंदुरे आणि कळसकरला शस्त्र दिली आणि पुण्यात बाईकचं नियोजन केले. हत्येच्या 10 दिवस आधी परिसराची रेकी अमोल काळेनेच केली. कुठे सीसीटीव्ही आहे का, याची पाहणी केली. या सर्व कटामागे वीरेंद्र तावडेचं ब्रेन आहे.”, असे सीबीआयने सांगितले. “दाभोलकरांच्या हत्येच्या एका दिवसापूर्वी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे औरंगाबादमधून पुण्याकडे निघाले. सकाळी पुण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांना दोन हत्यारं आणि बाईकची किल्ली देण्यात आली. ओंकारेश्वर पुलाजवळील मॉलसमोर बाईक पार्क करण्यात आली. त्याचवेळी 7 वाजून 10 मिनिटांनी नरेंद्र दाभोलकर ओंकारेश्वर पुलाजवळ पोहोचले. तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून अंदुरे आणि कळसकरने दाभोलकर असल्याचे कन्फर्म केले आणि कळसकरने दोन राऊंड, अंदुरेने एक राऊंड फायर केले. त्यानंतर बाईक पुण्याच्या बाहेर जाऊन पार्क करुन, ते औरंगाबादला पळाले. संध्याकाळी 5 वाजता ते औरंगाबादला पोहोचले

आणखी >>

एशियाडमध्ये महिला पैलवान विनेश फोगाटला सुवर्ण

जकार्ता : भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला. एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला पैलवान ठरली. गीता फोगाटने 2010 साली भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला कुस्तीत पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. विनेशने एशियाडच्या मॅटवर फोगाट कुटुंबियांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली. तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल गटात जपानच्या युकी इरीला अस्मान दाखवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. विनेश फोगाटचं एशियाडमधलं हे दुसरं पदक ठरलं. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. 2014 आणि 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विनेश फोगाटने सुवर्णपदकं पटकावली आहेत. बजरंग पुनियालाही सुवर्ण पैलवान बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. बजरंगने 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम लढतीत जपानच्या ताकातानी दाईचीचं कडवं आव्हान 10-8 असं मोडून काढलं. या लढतीच्या पहिल्या फेरीत बजरंगने 6-0 अशी आघाडी घेतली होती. पण दाईचीने आक्रमक खेळ करून 6-6 अशी बरोबरी साधली. त्यानंतर अतिशय चुरशीच्या कुस्तीत बजरंगने दाईचीवर दोन गुणांनी कुरघोडी केली. बजरंग पुनियाचं एशियाडमधलं हे दुसरं पदक ठरलं. त्याला 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. यंदा मात्र बजरंगने एशियाड सुवर्णपदकाची कसर भरुन काढली. याआधी ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं.

आणखी >>

पंतप्रधान मोदींच्या चिठ्ठीवरुन पाकिस्तानचा खोटारडेपणा

इस्लामाबाद: खोटं बोलण्यात पटाईत असणाऱ्या पाकिस्तानने इम्रान खान पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतरही आपला खोटारडेपणा कायम ठेवला आहे. पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दावा केला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिठ्ठी लिहून दोन्ही देशांतील संवाद सुरु करण्याचे संकेत दिले. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. भारताने चिठ्ठी लिहिली आहे, मात्र त्यातील मजकूर तसा नाही. जो दावा पाकिस्तान करत आहे, ती त्यांची इच्छा असावी, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. दहशवादी कारवायांमुळे संवाद नाही एकीकडे पाकिस्तान म्हणतंय की भारताने बातचीत करण्याबाबत म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत बातचीत शक्य नाही, अशी भारताची भूमिका आहे.  पाकिस्तानने काश्मीर राग आळवला दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पुन्हा काश्मीर राग आळवला. दोन्ही देशातील मुद्द्यांमध्ये काश्मीर एक सत्य आहे . त्यावर तोडगा निघणं आवश्यक आहे, असं कुरेशी म्हणाले. काश्मीर मुद्द्यावरुन कुरेश यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला. वाजपेयींनी लाहोर आणि इस्लामाबादचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानबाहेरच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवली होती. तसंच चर्चेशिवाय पर्याय नसल्याचं नमूद केलं होतं, असं कुरेशींनी सांगितलं. पंतप्रधान इम्रान खान यांचाही काश्मीर राग इम्रान खान यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणात भारत आणि अफगाणिस्तानवर अप्रत्यक्ष भाष्य केलं होतं. शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल, असं इम्रान खान म्हणाले होते. संबंध सुधारण्यासाठी शांतीची गरज आहे. भारताने एक पाऊल टाकल्यास आम्ही दोन पावलं टाकू, असं इम्रान खान म्हणाले. त्याचवेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये काश्मीर हा एक मुद्दा आहे असंही नमूद केलं होतं. आधी पंतप्रधान आणि आता परराष्ट्रमंत्री पाकिस्तानचे दोन्ही महत्त्वाचे नेते काश्मीर मुद्दा उपस्थित करत आहेत. म्हणजेच पाकिस्तानला भारताची चर्चा तर करायची आहे, मात्र काश्मीरचा मुद्दा समोर ठेवूनच. त्यामुळे ही चर्चा होते की नाही ते येणारा काळच ठरवेल.

आणखी >>

व्हॉट्सअॅप लवकरच तुमचे चॅट, फोटो, व्हिडिओ डिलीट करणार

मुंबई : व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या यूझर्सचा डेटा डिलीट करणार आहे. व्हॉट्सअॅपचा डेटा नोव्हेंबर महिन्यापासून व्हॉट्सअॅप ऐवजी गुगल ड्राईव्हमध्ये स्टोअर करण्यात येईल, त्यामुळे आतापर्यंतचा डेटा हवा असल्यास तुम्हाला वेळीच बॅकअप घ्यावा लागेल. व्हॉट्सअॅप आणि गुगलमध्ये झालेल्या डीलनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या डीलनुसार व्हॉट्सअॅपच्या सिस्टीममध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपला आपल्या यूझर्सचा डेटा डिलीट करावा लागणार आहे. यामध्ये तुमचं चॅट, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा समावेश आहे. व्हॉट्सअॅप यूझर्सना आपल्या अकाऊण्टमधील डेटा गुगल ड्राईव्हमध्ये साठवू देण्यास गुगलने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी गुगल ड्राईव्हची 15GB मोफत स्पेस वापरली जाणार नाही, तर अतिरिक्त जागेत हा डेटा स्टोअर करण्यात येईल. नोव्हेंबरनंतर तुमच्या चॅट, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा बॅकअॅप गुगल ड्राईव्हमध्ये घेण्यात येईल. त्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत यूझर्सना आपल्या डेटाचा बॅकअप घ्यावा लागेल. तसं न केल्यास तुमचा सर्व डेटा नाहीसा होईल. व्हॉट्सअॅप डेटाचा मॅन्युअल बॅकअप कसा घ्याल? गुगल ड्राईव्ह सेट अप करा व्हॉट्सअॅप ओपन करा. मेन्यू > सेटिंग्स > चॅट्स > चॅट बॅकअप बॅकअपवर क्लिक केल्यास गुगल ड्राईव्हमध्ये ऑटोमॅटिक बॅकअप होईल.

आणखी >>

क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गंभीर पुढच्या वर्षी भाजपतर्फे दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. गौतम गंभीर गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे भाजप प्रसिद्ध चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गौतम गंभीरच्या खांद्यावर ही धुरा सोपवली जाण्याचे संकेत आहेत. गंभीरने 2016 मध्ये अखेरची कसोटी, तर 2013 मध्ये अखेरची वनडे खेळली होती. भारतासाठी तो 58 कसोटी, 147 वनडे, 37 टी20 सामने खेळले आहेत. 154 आयपीएल सामन्यांमध्येही त्याची बॅट तळपली. कोलकाता नाईटरायडर्सने त्याच्या नेतृत्वात दोनवेळा आयपीएलचा किताब जिंकला. पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान नुकताच पाक पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही राजकारणाची वाट धरली आहे. नवज्योतसिंह सिद्धू, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफ यासारखे क्रिकेटपटू निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

आणखी >>

मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय

मुंबई:  मुंबईसह राज्यातील विविध भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई तर दोन दिवस पावसाने जोर धरला आहे. काल दिवसभरत येऊन-जाऊन असलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. मुंबईतील लालबाग, परळ, दादरसह दक्षिण मुंबईत तसंच अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, ठाणे, विक्रोळी, कुर्ला, तिकडे नवी मुंबई पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मात्र लोकल रेल्वे सध्या तरी सुरळीत आहेत. हवामानाचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होतोय. यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. नंदूरबारमध्ये जोरदार पावसामध्ये 6 जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. खरिपातील बहुतांश पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. तेव्हा जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं असल्यास, अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. राज्यभरात पाऊस सक्रीय राज्यभरात सध्या पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. पावसामुळं विदर्भातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं चांगलाच जोर धरला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस सुरु आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आजही राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे 7000 क्यू सेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. हे पाणी पंचगंगा नदीत येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळं पाडळी पुलावर पाणी आलं आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

आणखी >>

अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाच्या नेत्याची हत्या

अकोला : बाळापूर तालुक्यातील भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफखान यांची हत्या झाली आहे. आसिफखान यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीपात्रात फेकल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली आहे. आसिफखान 16 ऑगस्टच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. बेपत्ता आसिफखान यांची कार त्याच दिवशी अकोला आणि अमरावती सीमेवरील म्हैसांग येथे पूर्णा नदीच्या काठावर सापडली होती. पोलिसांनी संशयितांना अटक करुन, तपास केला असता आसिफखान यांची हत्या केल्याचे उघड झाले. मारेकऱ्यांनी हत्येची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांची नावं उघड केली असून, हत्यामागचं कारणही अद्याप समोर आले नाही. गेल्या चार दिवसांपासून आसिफखान यांचा शोध म्हैसांगच्या पूर्णा नदी पात्रात सुरु आहे. आसिफखान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. दरम्यान, या खुनामागे राजकीय किंवा पैशांचा वाद आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. आसिफखान कोण होते? आसिफखान मुस्तफाखान म्हणजे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव या सर्वात मोठ्या गावातील बडं प्रस्थ. आसिफ या गावचे पाच वर्षे सरपंचही होते. तर 2014 च्या निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून भारिप-बहूजन महासंघाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी मिळवली होती. बांधकाम क्षेत्रातही आसिफ यांनी अलिकडे जम बसवला होता. वाडेगावातील राजकारणात आसिफ वादग्रस्तही ठरले होते. अकोल्यात महिन्याभरात दोन नेत्यांच्या हत्या अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात दोन वेगवेगळ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या हत्या झाल्या. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद यांची हत्या झाली. त्यानंतर आता भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफखान मुस्तफाखान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

आणखी >>

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाला 5 वर्षे पूर्ण

मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यात विविध ठिकाणी मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे. दोनच दिवसांपूर्वी

आणखी >>
  • 1