याकूब मेमनला अखेर फासावर लटकावले...

नागपूर, ता. 30 जुलै 2015- मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला आज (गुरुवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास याकूबला येथील कारागृहात फाशी देण्यात आली. याकूबच्या वकिलांनी ऐनवेळी फाशीच्या शिक्षेला खोडा घालण्यासाठी दाखल केलेली अखेरची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

याकूबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने आज पहाटे पाच वाजता शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर त्याला साडेसहा वाजता फासावर लटवण्यात आले. याकूबच्या फाशीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, त्याला फाशी देताना सहा अधिकारी उपस्थित होते. याकूबचे शवविच्छेदन कारागृहातच करण्यात आले असून, त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. याकूबच्या फाशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी अकरा वाजता अधिकृत निवेदन देणार आहेत.

मेमनच्या दया याचिकेवर मध्यरात्री ३.२० वाजता न्यालयात ऐतिहासिक सुनावणी सुरू झाली. याकूबच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी, फाशीला १४ दिवस स्थगिती देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय थेट नागपूर तुरुंग प्रशासनाला कळविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नागपूरमध्ये तुरुंग प्रशासनाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल जमा करण्यास सांगितले.

  • याकूबला त्याच्या वाढदिवसी सकाळी साडेसहाच्या सुमारास फाशी.
  • याकूबच्या कुटुंबीयांनी पाठविलेला कारागृहात केक
  • सकाळी सात वाजता याकूबला मृत घोषित करण्यात आले.
  • याकूबकडून अखेरच्या क्षणी कुराण पठण
  • याकूब मेमनच्या फाशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग
  • मध्यरात्री रंगले फाशी टाळण्याचे कायदेशीर युद्ध!
  • फाशी गेटसाठी 22 लाख खर्च
  • ..आणि याकूबची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या