निवडणुकीमुळे वाहन तपासणी; तीन लाख रुपये जप्त

शिक्रापूर, ता. 31 जुलै 2015- शिरूर तालुक्यातीन अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून, काही गैरप्रकार घडू नयेत व अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहन तपासणी व नाकाबंदी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान एका उपसरपंचाचे तीन लाख रुपये जप्त केले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून अनेक ठिकाणी बेकायदेशीर पणे पैशाचा वापर होत असून, अनेक गावांमध्ये पैसे वाटले जात असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. सर्व प्रकार रोखण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी अचानक पणे शिक्रापूर येथे पुणे-नगररोड वर नाकाबंदी करत वाहन तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक वाहनांची कसून चौकशी सह तपासणी देखील करण्यात आली. अनेक वाहनांच्या तपासण्या करत असताना कोरेगाव भिमा जवळील वाडागाव चे उपसरपंच चंद्रेशेखर माळी यांच्या गाडीमध्ये पोलिसांना तीन लाख रुपये रोख रक्कम मिळून आली. यावेळी या रकमेबद्दल उपसरपंच माळी यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक व योग्य ती उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत कळविले असून ही रक्कम पोलिसांनी जप्त केली.

यावेळी या तपासणीसह अनेक अवैध्य वाहतूक तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक चेतन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप जगदाळे, दत्तात्रय शिंदे, पोपट गायकवाड, संजय ढमाल, बापूराव गावडे, योगेश पाटील यांनी हि कारवाई केली. निवडणूक काळात हद्दीतील अनेक ठिकाणी या प्रकारे कारवाई करणार असून, गैरप्रकारांवर वचक बसविणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

निवडणूक काळात उमेदवारांना परवानग्या घेणे बंधनकारक
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी आचारसंहिता लागू केलेली असून, या सर्व उमेदवारांना निवडणूक प्रचार काळात सर्व शासकीय विभागाच्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणूक सं २०१५ ची आचारसंहिता सुरु असून मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी जिल्ह्यात मु कलम ३७ ( १ ) ( ३ ) चा अमंल जरी केला असून त्यानुसार सि. आर. पि. सि १४९ प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत उमेदवारास पोलिस स्टेशन च्या वतीने नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीस द्वारे प्रत्येक उमेदवारास आचारसंहिता भंग करणे, निवडणूक प्रचार काळात सभा, रेली, पदयात्रा, कोपरासभा, स्पीकर लावणे, फ्लेक्स तसेच ब्यानर लावणे किव्हा इतर प्रकारे प्रचार करतेवेळी सर्व शासकीय विभागाच्या परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. निवडणूक काळात विनापरवाना प्रचार न करणे, मतदारांना धाक दाखवू नये, धार्मिक भावना दुखवू नये, प्रथानास्थळांचा वापर करू नये, मतदारांना लाच देऊ नये, नंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणुका काढता येणार नसून उमेदवारांच्या हस्तकांकडून असे प्रकार घडल्यास देखील उमेदवारास जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती देखील या पत्रकांद्वारे सर्व उमेदवारांना देण्यात आली असून तरी असे कृत्य उमेदवारांवर कारवाई करण्याचे आदेश देखील पोलिस स्टेशन यांना देण्यात आले आहेत.

www.shirurtaluka.com या संकेतस्थळावर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱया इच्छुक उमेदवारांचा अल्पपरिचय ठेवला जाईल, यासाठी संपर्क साधा.
तेजस फडके - 9766117755 / 9049685787

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या