शिरूर तालुक्यात लक्ष्मीपूजन उत्साहात!

रांजणगाव गणपती, ता. 12 नोव्हेंबर 2015 (पोपट पाचंगे)- दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन सणाचे औचित्य साधून परिसरात नागरिकांनी आपल्या वाहनांची पूजा करत सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

दिवाळी हा सण भारतीय संस्कॄतीमधील सर्वात महत्वाचा सण. यातील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या सणाचे औचित्य साधून शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांनी आपल्या वाहनांची पूजा केली. तालुक्यात मोठया उत्साहात सण साजरा करण्यात आला. शेतमालाला नसलेला भाव, वाढती महागार्इ, दुष्काळाचे भीषण संकट व आर्थिक मंदी यामुळे दिवाळी सणावर याचा मोठा परिणाम झाल्याचे विशेषत: ग्रामीण भागात दिसून आले.

रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा उद्योग समूहाच्या वतीने आपल्या जवळपास तीनशेहुन अधिका कामगारांना बोनस, गॄहोपयोगी वस्तू, मिठार्इ व दिवाळी फराळाचे वाटप बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक ज्ञानेश्वर पाचुंदकर, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पाचुंदकर, सचिन दुंडे, मोहन शेळके, अनिल दुंडे, संदिप शेळके, राहुल लांडे, ज्ञानेश्वर पवार यांसह कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या