रांजणगाव पोलीसांकडून दुचाकीचोर जेरबंद

No automatic alt text available.रांजणगाव गणपती, ता.२४ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : रांजणगाव पोलीसांनी गस्तीदरम्यान ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींकडून दोन चोरलेल्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, तुषार पंधरे, चंद्रकांत काळे, अमोल चव्हाण, मिलिंद देवरे, अमोल नलगे, उद्धव भालेराव हे पथक रांजणगाव एमआयडीसी मध्ये पेट्रोलिंग करीत असताना नितीन रामहरी जाधव (वय २२. रा ताडगाव ता कळंब जि उस्मानाबाद, २) अंकुश देविदास राठोड (वय २०. रा. पालसखेड, काकर ता. जामनेर जि. जळगाव, ३) प्रमोद गजेंद्र गुटळ (वय २१. वर्ष रा. पंढरेवाडी, ता. पंढरपूर जि. सोलापूर) हे तीन इसम संशयास्पद आढळुन आले.

त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी तिघांनी मिळून शिरूर येथून व हडपसर पुणे येथून प्रत्येकी एक एक यामाहा कंपनीच्या एफ झेड मोटार सायकली चोरल्या असल्याचे सांगितले.रांजणगाव पोलीसांनी त्यांच्या कडून चोरलेल्या दोन्ही मोटार सायकली ताब्यात घेऊन सदर चोरी बाबत माहिती घेतली असता शिरुर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन येथे वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहे.

रांजणगाव पोलीसांनी नुकतेच २२ चोरीच्या मोटारसायकलचे मोठे गुन्हे उघडकिस आणण्याचे काम केले होते तर वाहनचोरणा-यांना अटक करण्याची आठवड्यातील दुसरी कामगिरी आहे.त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या