शिरुर तालुका कोणाला मताधिक्य देणार? (मतचाचणी)

Image may contain: 2 people, people smiling, beard, eyeglasses and text
शिरुर, ता.४ मे २०१९(प्रतिनीधी) : शिरुर लोकसभा मतदार संघासाठी शिरुर तालुक्यात अत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या या निवडणुकित शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडुन विजयाचा दावा केला जात असला तरी प्रथमच अनिश्चितेचे प्रश्न घेउण उभे राहिलेल्या या निवडणुकिसाठी कोण विजयी होणार या बाबत मोठ मोठ्या पैंजा लागल्या असुन या वेळी आम्ही निश्चितच चौकार मारणार असा दावा शिवसेना भाजपाच्या वतीने केला जात असुन  आम्ही यॉर्कर वर ञिफळा उडवणार असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडुन केला जात आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघात ६१.५२ टक्के इतके मतदान झाले आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकित शिरुर हवेलीतुन ५९.६० टक्के इतके मतदान झाले होते.शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी एकुण ३ लाख ६९ हजार ८७२ एवढे मतदार आहेत.मागिल वर्षीच्या निवडणुकिच्या तुलनेत यावेळेस २ टक्के मतदान वाढलेले आहे.साधारण वाढलेले जे चाळिस हजार मतदान आहे,हे कोणाच्या पारड्यात मतदान पडणार यावर या निवडणुकिचे बरेचसे  चिञ अवलंबुन आहे.मागील निवडणुकित शिवसेनेचे शिवाजीराव आढ़ळराव पाटील हे तीन लाखांपेक्षा जास्त अधिक मताने निवडुन आले होते.माञ २०१९ च्या निवडणुकित शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात सरळ लढत होत आहे.मागिल दोन निवडणुक हि आढळराव पाटील यांना सोपी गेली असली तरी या निवडणुकित माञ डॉ.अमोल कोल्हे यांनी आढळरावांपुढे एक तगडं आव्हान निर्माण केलं आहे.डॉ.अमोल कोल्हे यांना प्रचारादरम्यान शिरुर तालुक्यात मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी या निवडणुकित एक चांगल्या प्रकारे स्थान बळकट  केल्याचे चिञ निवडणुकित पहावयास मिळाले.झालेल्या संपुर्ण निवडणुकित शिवसेनेच्या आढळरावांना ख-या अर्थाने साथ मिळाली ती भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांची.भाजपाने जर शिरुर शहर व तालुक्यात साथ दिली नसती तर अत्यंत वाईट अवस्था शिवसेनेची झाली असती असे राजकिय जाणकारांचे मत आहे.

शिरुर शहरात एकुण ३२ मतदान केंद्रे असुन २८ हजार ७४४ एवढे मतदार आहेत.शिरुर शहरात शिवसेना व राष्ट्रवादीकडुन दोघांकडुनही जोरदार प्रचार करण्यात आला.यात भाजपाचाही सहभाग मोठा होता.शिरुर नगरपरिषदेवर प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरुर विकास आघाडीची सत्ता असुन या आघाडीमध्ये शिवसेना,राष्ट्रवादीसह अनेक पक्ष सहभागी आहे.प्रचार सभेनिमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा शहरात झाली त्या सभेला प्रकाश धारिवाल यांनी हजेरी लावल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला.शिरुर नगरपरिषदेत दोन नगरसेवक शिवसेनेचे असुन ते विकास आघाडीचे आहेत.शिरुर शहरासह तालुक्यात सकाळपासुन मतदानाला नागरिकांचा उत्साह होता. अनेक ठिकाणी सायंकाळी मतदारांनी उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा  लावलेल्या होत्या.शिरुर शहरात दोन्ही पक्षाकडुन घरोघरी जाउन प्रचार करण्यात आला.शहरातुन मागिल वेळेस आढळराव पाटील यांना ३२०० एवढे मताधिक्य मिळाले होते.यावेळेस माञ आढळराव पाटील यांना दिड ते दोन हजारांपर्यंत मताधिक्य मिळेल असे मत राजकिय जाणकारांकडुन व्यक्त केले जात आहे.

शिरुर शहरातुन आढळराव पाटील यांचे मताधिक्य कमी होइल असे चिञ सध्यातरी दिसत आहे.शिरुर तालुक्यात या उलट परिस्थिती असुन शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीचे मताधिक्य राहिल असे चिञ सध्या दिसत आहे.शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असुन त्याचे नेतृत्व माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या करत आहेत.तर शिक्रापुर-सणसवाडी या जिल्हा परिषद गटातुन राष्ट्रवादीचे कुसुमताई मांढरे या नेतृत्व करत आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल या रांजणगाव सांडस-तळेगाव ढमढेरे गटात प्रतिनधित्व करत आहेत.शिरुर ग्रामीण न्हावरे गटातुन राजेंद्र जगदाळे हे नेतृत्व करत आहेत.या चारही गटांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असुन शिरुर तालुक्याच्या निम्म्या भागावर राजकियदृष्ट्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.इथं मिळणारे राष्ट्रवादीला मताधिक्य हे शिवसेनेला कमी करणे अवघड जाणार आहे.मागिल निवडणुकित मोदी लाटेमुळे अनेकांनी पक्ष न पाहता मतदान केले होते.माञ यावेळेस ग्रामीण भागातील मतदार तरुण वर्ग,राष्ट्रवादीच्या पाठीशी दिसुन आले.आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शिवसेनेला चांगल्या प्रकारे साथ देत तालुक्यात चांगली प्रचार यंञणा राबविली असली तरी त्याचा फायदा त्यांना कितपत झाला.हे सांगणे माञ तेवढेच अवघड आहे.या निवडणुकिचे वैशिष्टय म्हणजे गेल्या साडेचार वर्षांत शिवसेना भाजपात आलेले वितुष्ट हे समोर असतानाही शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासह संपुर्ण टिम त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहिल्याचे चिञ दिसले त्यामुळे ख-या अर्थाने आढळराव यांना भाजपने शिरुर तालुक्यात तारलं असं म्हणता येइल.

राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची दिग्गज फौज उभी राहिली होती.माजी आमदार अशोक पवार,प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल, जि.प.माजी अध्यक्ष प्रदिप कंद आदी भक्कमपणे उभे राहिले.निवडणुकिच्या सुरुवातील काहिसे अलिप्त असलेले नेते  नंतर माञ प्रचारात एकदिलाने उतरल्याचे मतदारांना पहावयास मिळाले.या तिघांमध्ये कुठलाही बेबनाव नसल्याचे दिसुन आले.कुठल्याही परिस्थितीत उमेदवार निवडुन आणायचा या उद्दिष्टाने या तिघांनी प्रयत्न केल्याचे तालुक्यात दिसुन आले. संपुर्ण निवडणुकिचा लेखा-जोखा पाहता शिरुर शहर व तालुक्यात भिन्न परिस्थिती असुन शिरुर शहरातुन आढळराव पाटील यांना मता धिक्य तर तालुक्यातुन डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता असे चिञ सध्यातरी दिसत आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या